IPL 2025 : ग्लेन मॅक्सवेलच्‍या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद!

रोहित शर्माच्‍या नावावर असणारा 'नकोसा' विक्रम काढला मोडित
IPL 2025
पंजाब किंग्‍ज संघाकडून खेळणारा मॅक्सवेल गुजरात विरुद्‍धच्‍या सामन्‍यात शून्‍यवर तंबूत परतला आणि त्‍याच्‍या नावावर एका लाजिरवाण्‍या विक्रमाची नोंद झाली.(Image source- X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग अशी ख्‍याती असणार्‍या इंडियन प्रीमियर लीग (IPL)मध्‍ये नेहमीच ऑस्‍ट्रेलियन खेळाडूंचा बोलबाला राहिला आहे. यामध्‍ये ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याचे नाव आघाडीवर आहे. मात्र मंगळवारी पंजाब किंग्‍ज संघाकडून खेळणारा मॅक्सवेल गुजरात विरुद्‍धच्‍या सामन्‍यात शून्‍यवर तंबूत परतला आणि त्‍याच्‍या नावावर एका लाजिरवाण्‍या विक्रमाची नोंद झाली आहे. (IPL 2025)

IPL 2025 : रोहित-कार्तिकलाही टाकले मागे

आयपीएलच्‍या यंदाच्‍या हंगामातील पाचवा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात मंगळवारी खेळला गेला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्‍या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलला मोठा धक्का बसला. तो खाते न उघडताच तंबूत परतला. त्याला साई किशोरने यष्‍टीचीत केले. या कामगिरीमुळे तो आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज बनला. आयपीएलमध्ये तो खाते न उघडता बाद होण्याची त्‍याची १९ वी वेळ होती.

सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेले फलंदाज

खेळाडू किती वेळा शून्यावर बाद

ग्लेन मॅक्सवेल १९

रोहित शर्मा १८

दिनेश कार्तिक १८

पियुष चावला १६

सुनील नेरन १६

मॅक्सवेलसाठी पंजाबने मोजले ४.२ कोटी

आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी आरसीबीने मॅक्सवेलला रिलीज केले. यानंतर पंजाबने त्याला ४.२ कोटी रुपयांना खरेदी केले. गेल्या हंगामात त्याने नऊ सामन्यांमध्ये ५.७७ च्या सरासरीने फक्त ५२ धावा केल्या आणि त्याचा सर्वोत्तम धावसंख्या २८ धावा होती. गोलंदाजीतही तो प्रभावी कामगिरी करु शकला नाही. मागील हंगामात त्‍याने ८.०६ च्या इकॉनॉमी रेटने फक्त सहा विकेट्स घेतल्या होत्‍या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news