नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुलला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती पंजाब किंग्जने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली. शनिवारी रात्री राहुलच्या पोटात दुखू लागले. त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले होते पण, त्याने त्याच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्याला आपत्कालीन रुममध्ये नेण्यात आले.
याबाबत पंजाब किंग्जने ट्विट केले की 'काल रात्री केएल राहुल याच्या पोटात दुखू लागले होते. त्याला दिलेल्या औषधांचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्यानंतर त्याला आपत्कालीन रुममध्ये नेण्यात आले. त्याच्यावर काही चाचण्या करण्यात आल्या त्यावेळी त्याला स्वदूपिंडाचा त्रास असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर आता शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.'
पंजाबचा आज दिल्ली कॅपिटल्स बरोबर सामना होणार आहे. राहुल संघात नसल्यामुळे आता ख्रिस गेल पंजाब किंग्जचे कर्णधारपद भूषवणार आहे. पंजाबसाठी राहुल संघात नसणे हा मोठा धक्का आहे. कराण तो यंदाच्या हंगामात धावा करण्यात आघाडीवर आहे. सध्या ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत राहुल ३३१ धावा करुन आघाडीवर आहे.