

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारताने इंग्लंडविरूध्द टी-20 मालिकेपाठोपाठ वन-डे मालिकेतही विजय मिळवला. कटक येथे झालेल्या सामन्यात ४ गडी राखून इंग्लंडचा पराभव केला. रोहित शर्माच्या ११९ धावांच्या दमदार खेळीच्या बळावर भारताने ३०५ धावांचे आव्हान पार केले.
तत्पूर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर फिल साल्ट आणि डकेट यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. डकेटने ६५ धावा केल्या, तर काही काळापासून एकदिवसीय सामन्यांमध्ये फॉर्मसाठी संघर्ष करणाऱ्या जो रूटने ६९ धावांची खेळी केली. एकीकडे धावा फलक हालता ठेवताना बेन डकेट आणि जो रूट वगळता इंग्लंडचे फलंदाज मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरले. भारताला धावगती नियंत्रित करण्यात यश आले. बेन डकेट आणि जो रूट यांचे अर्धशतक तर , लियाम लिव्हिंगस्टोनने ३२ चेंडूत ४१ धावा केल्याने इंग्लंडचा संघ भारतासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात यशस्वी झाला. इंग्लंडने ४९.५ षटकांत ३०४ धावांपर्यंत मजल मारली.
भारताकडून रोहित शर्माने ९० चेंडूत ११९ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याच्याशिवाय शुभमन गिलने ५२ चेंडूत ६० धावांची अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोठे योगदान दिले. श्रेयस अय्यरने ४७ चेंडूत ४४ धावा केल्या. त्याचबरोबर रवींद्र जडेजाने ही गोलंदाजीत ३ विकेट्स घेत महत्त्वाची भूमिका बजावली.
श्रेयस अय्यर ४४ धावांवर धावबाद झाला. दोन धावा घेण्याच्या गोंधळात श्रेयसला विकेट गमावावी लागली. श्रेयसने अक्षर पटेलच्या संमतीशिवाय धाव घेतली.
९० चेंडूत ११९ धावा करत भारताला विजयाच्या दिशेने घेवून जात असताना रोहित शर्मा बाद झाला. लिव्हिंगस्टोनने रोहितला बाद केले, आदिल रशीदने त्याचा झेल पकडला. रोहित स्टँडकडे परतत असताना प्रेक्षकांनी उभे राहून त्याच्या खेळीचे कौतूक केले.
मागील काही दिवस मैदानात फलंदाजीसाठी उतरल्यानंतर चाचपडणार्या टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याला अखेर आज इंग्लडं विरुद्धच्या वनडे सामन्यात सूर गसवला. त्याने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन करत ७६ चेंडूत शतकी खेळी साकारली.
शुभमन पाठोपाठ विराट कोहलीही अवघ्या ५ धावांवर बाद झाला. इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीद याने त्याला यष्टीरक्षक साल्टकडे झेल देण भाग पाडले. भारताला १५० धावांवर दुसरा धक्का बसला आहे. राेहित शर्मा ८१ धावांवर तर श्रेयस अय्यर १ वर खेळत आहे.
१३६ धावांवर भारताला पहिला धक्का बसला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेमी ओव्हरटनने गिला त्रिफळाचीत केले. शुभमनने ५२ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकार फटकावत ६० धावांची खेळी केली.
रोहित शर्मानंतर शुभमन गिलनेही अर्धशतक झळकावले आहे. त्याने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील १५ वे अर्धशतक ४५ चेंडूत पूर्ण केले. १५ षटकांत भारताने विनबाद ११४ धावा केल्या आहेत.
कर्णधार रोहित शर्माचे झुंजार अर्धशकत, मागील अनेक महिने फॉर्मसाठी झगडत असलेल्या रोहित शर्माने ३२ चेंडूत अर्धशतक झळकावले, रोहितच्या फॉर्ममूळे भारताचा चॅम्पियन ट्रॉफीपूर्वी दिलासा मिळाला आहे.
फ्लडलाइटमध्ये बिघाडातील दुरुस्तीनंतर सामना पुन्हा सुरु झाला आहे. भारताने ७ षटकात विनाबाद ५७ धावा केल्या आहेत.
सहा षटकांचा सामना झाल्यानंतर फ्लडलाइटमध्ये बिघाड झाल्याने सामना ६:१३ वाजता थांबवण्यात आला. मैदानावर कमी प्रकाश असल्याने खेळाडूंना खेळण्यात अडचणी येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. ६:१६ वाजता फ्लडलाइट सुरु झाल्या आणि ६:१७ वाजता पुन्हा बंद झाला. ६:१९ वाजता लाईट परत आली पण ६:२१ वाजता पुन्हा गेली. सामना थांबला तेव्हा भारतपाने विनाबाद ४७ धावा केल्या आहेत. रोहित २९ धावांसह आणि गिल १६ धावांसह खेळत आहे.
भारताच्या डावाची सुरुवात झाली आहे. कर्णधार राेहित शर्माने दुसर्या व तिसर्या षटकात दाेन षटकार ठाेकत आपल्यावरील दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला. 5 षटकांत भारताने विनाबाद ३९ धावा केल्या. राेहित २७ तर शुभमन १० धावांवर खेळत आहे.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर फिल साल्ट आणि डकेट यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. डकेटने ६५ धावा केल्या, तर काही काळापासून एकदिवसीय सामन्यांमध्ये फॉर्मसाठी संघर्ष करणाऱ्या जो रूटने ६९ धावांची खेळी केली. एकीकडे धावा फलक हालता ठेवताना बेन डकेट आणि जो रूट वगळता इंग्लंडचे फलंदाज मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरले. भारताला धावगती नियंत्रित करण्यात यश आले. बेन डकेट आणि जो रूट यांचे अर्धशतक तर , लियाम लिव्हिंगस्टोनने ३२ चेंडूत ४१ धावा केल्याने इंग्लंडचा संघ भारतासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात यशस्वी झाला आहे. इंग्लंडने ४९.५ षटकांत ३०४ धावांपर्यंत मजल मारली. अष्टपैलू रवींद्र जडेजाने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. आता विजयासाठी भारताला ३०५ धावांचे लक्ष्य पूर्ण करायचे आहे.
इंग्लडने आपल्या डावात सर्व गडी गमावत ३०४ धावा केल्या. त्यांनी आता ३०५ धावांचे आव्हान भारतापुढे ठेवले आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये इंग्लडचा लिव्हींग स्टोन दुसरी धाव घेत असताना रन ऑऊट झाला. तर मार्क वूडही रनआऊट झाला
जडेजाच्या फिरकीवर इंग्लडचा जेमी ओव्हरटोनही बाद झाला. शूभमन गिलने त्याचा झेल घेतला. जेमीने केवळ ६ धावा केल्यास आखूड चेंडू खेळताना मिड ऑफच्या दिशेला टोलवला पण शुभमनने अलगद झेल पकडला
४३ व्या शतकात इंग्लडला पाचवा धक्का बसला. जडेजाच्या फिरकीवर ज्यो रुटने विराटकडे सिमा रेषेवर सोपा झेल दिला. रुट ने ७२ चेंडूत ६९ धावांची खेळी केली.
हार्दिक पंड्याने जोस बटलरला बाद करून इंग्लंडला चौथा धक्का दिला. बटलरने 35 चेंडूत दोन चौकारांसह 35 धावा केल्या.
इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले आहे. रूटने ६० चेंडूत अर्धशतक केले.
हर्षित राणाने भारताला तिसरे यश मिळवून दिले. इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रुकने मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली. शुभमन गिलने शानदार झेल घेतला. ब्रूक 52 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकारासह 31 धावा काढून बाद झाला.
रवींद्र जडेजाने बेन डकेटला बाद करत इंग्लंडला दुसरा धक्का दिला. डाकेटने शानदार फलंदाजी केली आणि अर्धशतक झळकावले. त्याने 56 चेंडूत 10 चौकारांसह 65 धावा काढल्या.
नवोदित फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने अखेर भारताला पहिला बळी मिळवून दिला. वरुणने सलामीवीर फिल साल्टला बाद केले, जो बेन डकेटसोबत चांगली भागीदारी करत होता. २९ चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २६ धावा काढल्यानंतर सॉल्ट बाद झाला. यासोबतच, साल्ट आणि डेकेथ यांच्यातील पहिल्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी संपुष्टात आली.
इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटने भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावले आहे. डकेटने सॉल्टसह इंग्लंडला चांगली सुरुवात करून दिली आणि धावसंख्या ८० धावांच्या पुढे गेली आहे. डकेटने 36 चेंडूत 50 धावा पुर्ण केल्या. त्याने या खेळीदरम्यान 9 चौकार मारले.
साल्ट आणि डकेत यांनी पहिल्या विकेटसाठी 50+ धावांची भागीदारी केली. या दोन्ही फलंदाजांनी इंग्लंडला चांगली सुरुवात करून दिली आणि भारतीय गोलंदाजांवर दबाव कायम ठेवला. 10 षटकांनंतर इंग्लंडने बिनबाद 77 धावा केल्या आहेत.
फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लडच्या सलामीवीरांनी आक्रमक फलंदाजी केली आहे. त्यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पावित्रा घेत भारतीय गोलंदाजांची पळताभुई थोडी केली. त्यांनी अप्रतिम फटकेबाजी करत चौकारांची बरसात केली. तसेच पहिल्या सहा षटकांत 44 धावा कुटल्या. यामध्ये डकेटने 34 धावा केल्या तर साल्टने 6 धावा बनवल्या आहेत.
भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिल सॉल्ट आणि बेन डकेट डावाची सुरुवात करण्यासाठी आले आहेत, तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गोलंदाजीची सुरुवात करण्यासाठी आला आहे.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन : फिलिप साल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, गस अॅटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वूड, साकिब महमूद
भारत प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती
कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली आहे. तो या फॉरमॅटमध्ये १४००० धावा पूर्ण करण्यापासून फक्त ९४ धावा दूर आहे. जर त्याने ही कामगिरी केली तर तो सचिन तेंडुलकर (१८,४२६) आणि कुमार संगकारा (१४,२३४) नंतर हा टप्पा गाठणारा तिसरा फलंदाज ठरेल. कोहलीप्रमाणेच कर्णधार रोहितलाही धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात तो फक्त दोन धावा करू शकला. गेल्या वर्षी कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध ६४ धावा काढल्यानंतर मुंबईच्या या फलंदाजाने कोणत्याही स्वरूपात अर्धशतक झळकावलेले नाही. जर रोहित दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही धावा करू शकला नाही तर त्याच्या फॉर्म आणि भविष्याबद्दल शंका निर्माण होतील.