IND vs WI 2nd Test Live : पहिल्या दिवसाअखेर भारताची धावसंख्या २ बाद ३१८, जैस्वाल १७३ धावांवर नाबाद

IND vs WI 2nd Test Live
IND vs WI 2nd Test LivePudhari Photo

IND vs WI 2nd Test Live :

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं चहापानापर्यंत २२० धावांपर्यंत मजल मारली आहे. सलामीवीर यशस्वी जयस्वालने शतक ठोकलं असून साई सुदर्शन शतकाच्या उंबरठ्यावर आहे. वेस्ट इंडीजला आतापर्यंत खेळात भारताचा फक्त एक फलंदाज बाद करण्यात यश आलं आहे.

पहिल्या दिवसाचा खेळ संपला

पहिल्या दिवसाचा खेळ संपला. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने पहिल्या डावात दोन विकेट गमावून ३१८ धावा केल्या आहेत. सध्या यशस्वी जैस्वाल १७३ आणि कर्णधार शुभमन गिल २० धावांवर नाबाद आहे. या दोघांनी आतापर्यंत तिसऱ्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली आहे. भारतीय संघाच्या दोन विकेट्समध्ये केएल राहुल आणि साई सुदर्शन यांचा समावेश आहे. राहुल ३८ धावांवर बाद झाला तर सुदर्शन ८७ धावा करून माघारी परतला. यशस्वीने सातवे कसोटी शतक झळकावले. त्याने दुसऱ्या विकेटसाठी सुदर्शनसोबत १९३ धावांची भागीदारी केली.

भारताच्या ३०० धावा पूर्ण

भारताने दोन विकेट गमावत ३०० धावा पूर्ण केल्या. शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल क्रीजवर आहेत.

यशस्वी जैस्वालच्या १५० धावा पूर्ण

यशस्वी जैस्वालने १५० धावा पूर्ण केल्या. त्याने २२४ चेंडूत ही कामगिरी केली. यशस्वीने आतापर्यंत सात शतकांपैकी पाच वेळा १५०+ धावा केल्या आहेत. यावेळी भारताने दोन विकेट गमावून २९० धावांचा टप्पा पार केला.

तिस-या सत्राचा खेळ सुरू होऊन काही षटकांचा खेळ पार पडला असतानाच भारताला दुसरा धक्का बसला. विंडिजच्या वॉरिकनने साई सुदर्शनला एल्बीडब्ल्यू बाद केले. साईने जैस्वालशी चर्चा करून रिव्ह्यू घेतला. चेंडू ऑफस्टंपवरून झटक्यात फिरला आणि डावखुऱ्या फलंदाजाला चुकवत डाव्या पायाच्या पॅडवर आदळला. रिव्ह्यूमध्ये चेंडूचा आणि बॅटचा संपर्क नसल्याचे स्पष्ट झाले. बॉल ट्रॅकिंगमध्ये चेंडू थेट लेगस्टंपवर आदळणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तिस-या पंचांनी मैदानी पंचांचा निर्णय कायम ठेवला. अशा प्रकारे साई सुदर्शनला पहिल्या कसोटी शतकाने केवळ 13 धावांनी हुलकावणी दिली. साईने 165 चेंडूत 12 चौकारांसह 87 धावा केल्या.

IND 220/1 (58)

चहापानापर्यंत भारतानं १ बाद २२० धावांपर्यंत मजल मारली आहे. सलामीवीर यशस्वी जयस्वाल शतकी (नाबाद १११) खेळी करून तर साई सुदर्शन ७१ धावा करून नाबाद आहे. अजून दिवसाचं शेवटचं सत्र शिल्लक असून भारत पहिल्याच दिवशी ३०० पारची धावसंख्या उभारण्याची शक्यता आहे.

ND 179/1 (45.2)

यशस्वी-साईची शतकी भागीदारी. भारतानं ४५ षटकात १७९ धावांपर्यंत मजल मारली.

IND 112/1 (30) यशस्वीचं अर्धशतक

सलामीवीर यशस्वी जयस्वालनं आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. त्यानं केएल राहुल बाद झाल्यानंतर साई सुदर्शनच्या साथीनं भारताचं शतक देखील धावफलकावर झळकावलं.

IND 58/1 (17.3) भारताला पहिला धक्का 

भारताचे सलामीवीर केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी अर्धशतकी मजल मारली होती. मात्र १८ व्या षटकात केएल राहुल ३८ धावा करून बाद झाला.

भारताची सावध सुरूवात 

भारतानं पहिल्या ७ षटकात बिनबाद १६ धावा करत सावध सुरूवात केली.

भारतानं नाणेफेक जिंकली

भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

दिल्लीत बॅटिंग पीच?

दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यानं सांगितलं की दिल्लीत बॅटिंग पीच मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं ते सामना पाहण्यासाठी आले आहेत. नेहमीप्रमाणं भारतच सामना जिंकेल असा विश्वास या चाहत्यानं बोलून दाखवला.

logo
Pudhari News
pudhari.news