

IND vs RSA 1st Test 3rd Day : कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ३० धावांनी पराभव केला. भारतीय संघाने पहिल्या डावात ३० धावांची आघाडी घेतली होती, परंतु दक्षिण आफ्रिकेने पुनरागमन केले आणि गोलंदाजांवर अवलंबून राहून भारताला पराभूत केले आणि दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिका १५३ धावांवर सर्वबाद झाली आणि १२३ धावांची आघाडी घेऊन त्यांनी भारतासमोर १२४ धावांचे लक्ष्य ठेवले. भारतीय फलंदाजांच्या हाराकिरीमुळे दुसरा डाव ९३ धावांवरच आटोपला.
आयडेन मार्करामने डावाच्या ३१ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरला बाद केले. ९२ चेंडूत ३१ धावा काढून सुंदर बाद झाला.यानंतर भारताला अक्षर पटेलच्या रूपात मोठा धक्का बसला. अक्षर चांगली फलंदाजी करत होता आणि त्याने केशव महाराजांच्या षटकात १६ धावा केल्या होत्या, परंतु उंच शॉट खेळण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली. अक्षर १७ चेंडूत २६ धावा काढून बाद झाला, त्याने एक चौकार आणि दोन षटकार मारले. भारताला आता विजयासाठी ३१ धावांची आवश्यकता आहे.
भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक धावा केल्या आणि तो ३१ धावांवर बाद झाला. अक्षर पटेल चांगली फलंदाजी करत होता आणि केशव महाराजच्या गोलंदाजीवर सलग चौकार आणि षटकार मारून भारताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करत होता, परंतु तो खराब शॉट खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला आणि त्यानंतर केशवने मोहम्मद सिराजला बाद करून भारताचा डाव संपवला. दुसऱ्या डावातही भारताकडून कर्णधार शुभमन गिलने फलंदाजी केली नाही.भारताकडून वॉशिंग्टन आणि अक्षर व्यतिरिक्त रवींद्र जडेजा १८, ध्रुव जुरेल १३, ऋषभ पंत २, केएल राहुल १ आणि कुलदीप यादव १ धावा काढल्या. जसप्रीत बुमराह खाते न उघडता नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून सायमन हार्मरने चार, तर मार्को जानसेन आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. एडेन मार्करामने एक बळी घेतला.
हार्मरने जडेजाला पायचीत केले. भारताने ६४ धावांवर ५ गडी गामवले आहेत.
भारताने २३ व्या षटकामध्ये ५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. सुंदर २३ तर जडेजा १२ धावांवर खेळत आहे.
विसाव्या षटकात भारताला चौथा धक्का बसला. हार्मरने त्याला तंबूत धाडले. त्याने केवळ दोन धावांची भर घातली. भारताने ३२ धावांवर चार गडी गमावले आहेत.
१५ षटकात भारताला हार्मरने तिसरा धक्का दिला. जुरेलने फटका मारण्याच्मा प्रयत्नात बॉशकडे सोपा झेल दिला. त्याने ३४ चेंडूत १३ धावा केल्या.
लंच ब्रेकनंतर दुसरे सत्र सुरू झाले आहे. ९ षटकांनंतर, भारताची २ बाद २६ धावा आहेत. ध्रुव जुरेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्याकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कोलकाता कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात एकूण ५ विकेट पडल्या. दक्षिण आफ्रिकेच्या तीन विकेट पडल्या, तर भारताच्या दुसऱ्या डावात आतापर्यंत दोन विकेट पडल्या. दुपारच्या जेवणाच्या वेळी भारताचा स्कोअर २ बाद १० होता. भारताला विजयासाठी ११४ धावांची आवश्यकता आहे. वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल सध्या क्रीजवर आहेत.
जयस्वाल पाठोपाठ केएल राहुल यालाही मार्को जॅन्सन बाद केले. भारताचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले आहेत.
भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल डावाची सुरुवात करण्यासाठी आले. पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मार्को जॅन्सनने सलामीवीर यशस्वी जयस्वालला बाद केले. यशस्वी आपले खाते उघडू शकला नाही. पहिल्या षटकानंतर भारताची धावसंख्या ०/१ होती.
मोहम्मद सिराजने ५४ व्या षटकात केशव महाराजला पायचीत केले. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १५३ धावांवर संपुष्टात आला आहे. कर्णधार बवुमा याने एकाकी झूंज दिली. तो १३६ चेंडूंचा सामना करत ५५ धावांवर नाबाद राहिला. आता भारताला मालिकेतील पहिल्या कसोटीत विजय नोंदविण्यासाठी १२४ धावांची गरज आहे.
५४ व्या षटकात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने हार्मरला क्लीन बोल्ड केले. त्याने ७ धावा केल्या. दक्षिण अफ्रिकेने दुसर्या डावात ५४ षटकांमध्ये ९ गडी गमावत १५३ धावा केल्या आहेत.
टेम्बा बावुमाने ५० व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर चौकार मारत ५० वा धावा पूर्ण केल्या. या कसोटीत ५० वा धावा पूर्ण करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. अत्यंत खडतर परिस्थितीत टेम्बा बावुमाने ज्या पद्धतीने संघाला हाताळले ते कौतुकास्पद आहे. दक्षिण आफ्रिका संघाने १५० धावांचा टप्पाही पार करत १२० धावांपेक्षा जास्त धावांची आघाडी घेतली आहे.
टेम्बा आणि कॉर्बिन यांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ४८ व्या षटकात बुमराहने काँर्बिनला क्लीन बोल्ड केले. त्याने ३७ चेंडूत दोन चौकार आणि एका षटकार फटकावत त्याने २५ धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेचा डाव ९३ धावांच्या धावसंख्येवरून सुरु झाला आहे. कॉर्बिनबोश आणि टेम्बा बावुमा क्रिझवर असून, दक्षिण आफ्रिका संघाने १०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. ४० षटकांत दक्षिण आफ्रिकेने ७ बाद १०६ धावा केल्या आहेत. टेम्बा (३५) आणि कॉर्बिन (८) फलंदाजी करत आहेत. भारतीय गोलंदाज दक्षिण आफ्रिका संघाचा डाव किमान धावसंख्येपर्यंत मर्यादित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे खेळला जात आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळापर्यंत दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात ७ विकेट गमावून ९३ धावा केल्या आहेत. त्याआधी, दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात १५९ धावांवर सर्वबाद केले होते, ज्याच्या प्रत्युत्तरात भारताने १८९ धावा केल्या. आजचा दिवस खूप रोमांचक असणार आहे. दक्षिण आफ्रिकेकडे सध्या ६३ धावांची आघाडी आहे. तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र सुरू झाले आहे. दक्षिण आफ्रिकेचा डाव ९३ धावांच्या धावसंख्येवरून सुरु झाला आहे. कॉर्बिनबोश आणि टेम्बा बावुमा क्रिझवर आहेत.
कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळल्या जाणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील या सामन्यात गोलंदाजांची ताकद दिसून आली आहे. पहिल्या दिवशी एकूण ११ विकेट गेल्या. तर दुसऱ्या दिवशी तबब्ल १५ फलंदाज तंबूत परतले. शनिवारीचा दिवस फिरकीपटूंनी आपल्या नावावर केला. दुसऱ्या डावात भारताने आतापर्यंत घेतलेल्या सर्व सात बळी फिरकीपटूंनी घेतले आहेत. पहिल्या डावात भारताला बाद केल्यानंतर, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना फिरकी गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करावा लागला.