

भारतानं पहिल्या डावात ३० धावांची आघाडी घेतल्यानंतर दक्षिण अफ्रिकेनं आपला दुसरा डाव सुरू केला. मात्र रविंद्र जडेजाच्या भेदक माऱ्यासमोर अफ्रिकेच्या फलंदाजांनी एका पाठोपाठ एक लोटांगण घालणं सुरू केलं. जडेजानं चार धक्के दिल्यानं दिवस अखेर अफ्रिकेची अवस्था ७ बाद ९३ धावा अशी झाली आहे. रविंद्र जडेजानं आतापर्यंत ४ तर कुलदीप यादवनं २ आणि अक्षर पटेलनं १ विकेट घेतली. टेम्बा बाऊमा २९ धावा करून एकाकी झुंज देत आहे.
पहिल्या दिवशी भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १५९ धावात गुंडाळला होता. त्यानंतर दिवसअखेर एक बाद ३७ धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर भारताचा देखील पहिला डाव १८९ धावात संपुष्टात आला. भारताकडं जरी पहिल्या डावात ३० धावांची आघाडी असली तरी त्यांना २०० धावांचा टप्पा काही पार करता आला नाही.
भारताकडून केएल राहुलनं सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली. त्याला २९ धावा करून वॉशिंग्टन सुंदरनं चांगली साथ दिली. ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा या दोन डावखुऱ्या फलंदाजांनी प्रत्येकी २७ धावांचे योगदान दिलं. भारताचा कर्णधार शुभमन गिल फलंदाजी करताना रिटार्ड हर्ट झाला. तो परत फलंदाजीला आला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून हार्मेरनं चांगला मार करत ४ विकेट्स घेतल्या. मार्को येनसेननं ३ विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी आफ्रिकेची दुसऱ्या डावात ७ बाद ९३ धावा केल्या आहेत. त्यांच्याकडे ६३ धावांची आघाडी आहे.
रविंद्र जडेजानं आता अक्षर पटेलनं आपला जलवा दाखवला. त्यानं वेरियानेला ९ धावांवर बाद करत सहावा धक्का दिला.
भारतानं दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या डावात एकापाठोपाठ एक असे चार धक्के दिले. रविंद्र जडेजानं त्यातील ३ विकेट्स घेतल्या तर कुलदीप यादवनं एक विकेट घेत त्याला चांगली साथ दिली.
चहापानानंतर दक्षिण अफ्रिकेनं आपला दुसरा डाव पुन्हा सुरू केला. मात्र त्यानंतर रविंद्र जडेजानं एडिन माक्ररमला बाद करत अफ्रिकेला अजून एक मोठा धक्का दिला.
चहापानापूर्वी कुलदीप यादवनं दक्षिण अफ्रिकेला पहिला धक्का दिला. त्यानं रिकेल्टनला ११ धावांवर बाद केलं.
शुभमन गिल (मानेचा दुखापत) मैदानात उतरला नाही कारण भारत १८९ धावांवर बाद झाला आणि त्यांना ३० धावांची आघाडी मिळाली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या सायमन हार्मरने ३० धावांवर ४ धावा केल्या. मार्को जॅन्सनने तीन बळी घेतले, तर कॉर्बिन बॉशने ऋषभ पंतला बाद केले.
भारताची पडझड काही केल्या थांबत नाहीये. रविंद्र जडेजा २७ धावा करून बाद झाल्यानंतर कुलदीप यादव देखील १ धावांची भर घालून माघारी परतला.
भारतानं पहिल्या डावात आघाडी घेण्यास सुरूवात केली आहे. मात्र भारताला ध्रुव जुरेलच्या रूपात पाचवा धक्का बसला. तो १४ धावा करून बाद झाला आहे. आता क्रिजवर रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल खेळत आहेत.
केएल राहुल बाद झाल्यानंतर पंत आणि जडेजानं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र कॉर्बीन बॉशनं भारताला मोठा धक्का दिला. त्यानं पंतला २७ धावांवर बाद केलं.
भारताला दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात अजून दोन धक्के बसले. सुंदर नंतर केएल राहुल देखील ३९ धावा करून बाद झाला. गिल रिटायर्ड हर्ट झाल्यानं आता संपूर्ण मदार ही ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा यांच्यावर असणार आहे.
वॉशिंग्टन सुंदरनं २९ धावा करत केएल राहुलची सोडली साथ.. आल्या आल्या कर्णधार रिटायर्ड हर्ट. ऋषभ पंत आला क्रिजवर
भारताचं अर्धशतक पार. राहुल अन् सुंदरनं गिअर बदलला.