भारताच्या फलंदाजांची हाराकिरी, अवघ्‍या ४६ धावांवर पहिला डाव संपुष्‍टात

IND vs NZ 1st Test Live |पाच फलंदाज शून्‍यावर बाद
IND vs NZ 1st Test Live
न्‍यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताची खराब सुरुवात झाली. टीम इंडियाने १० धावांवर तीन विकेट गमावल्‍या. IND vs NZ 1st Test Live

टॉस जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

IND vs NZ 1st Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा बुधवारचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला होता. काल टॉसही झाला नव्हता. आज गुरुवारी टॉस झाला. भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगला देश विरुद्धच्या कसोटी मालिकेतील निर्भेळ विजयानंतर आता भारताची नजर न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेकडे आहे. दोन्ही संघांतील पहिला सामन्याला आज (गुरुवारी) पासून बंगळूरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरुवात झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

घरच्या मैदानावर भारताची सर्वात खराब कामगिरी

46 धावा ही भारतीय क्रिकेट संघांची तिसरी निच्‍चांकी धावसंख्‍या ठरली आहे. भारताने दोन वर्षांपूर्वी न्यूझीलंडने केलेला विक्रम मोडला. 2021 मध्ये वानखेडेवर किवी संघ 62 धावांत गारद झाला होता. घरच्या मैदानावर भारताची ही सर्वात खराब कामगिरी आहे. 37 वर्षांपूर्वी म्हणजेच 1987 मध्ये दिल्लीत भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध 75 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्धची ही भारताची सर्वात खराब धावसंख्या आहे. यापूर्वी 1976 मध्ये टीम इंडियाने वेलिंग्टनमध्ये किवीजविरुद्ध 81 धावा केल्या होत्या. भारताची कसोटीतील तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी २०२० मध्ये ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ ३६ धावांवर बाद झाला होता. त्याच वेळी, 1974 मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध टीम इंडिया 42 धावांवर ऑलआऊट झाली होती.

नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय ठरला चुकीचा

बेंगळुरू कसोटीत भारताचा पहिला डाव अवघ्‍या ३१.२ षटकात 46 धावांवर आटोपला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधार रोहित शर्माचा निर्णय चुकीचा ठरला. ढगाळ वातावरणात टीम इंडियाचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. संघाच्या पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. विराट कोहली, सरफराज खान, केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांचा समावेश आहे. ऋषभ पंतने सर्वाधिक 20 धावा केल्या. तर यशस्वी जैस्वालने १३ धावांची खेळी केली. रोहित शर्मा दोन धावा करून बाद झाला तर जसप्रीत बुमराह एक धाव काढून बाद झाला.

टीम इंडियाचा पहिला डाव ४६ धावांवर संपुष्‍टात

कुलदीप यादव दोन धावांवर बाद झाला आणि भारताचा पहिला डाव ४६ धावांवर संपुष्‍टात आला आहे. कसोटी क्रिकेटमधील भारतीय संघाची ही तिसरी निच्‍चांकी धावसंख्‍या ठरली आहे.

भारताचा निम्मा संघ शून्यावर तंबूत

भारताच्या पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. यामध्ये विराट कोहली, सर्फराज खान, केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि अश्विन यांचा समावेश आहे. १९९९ मध्‍ये मोहाली कसोटीत न्‍यूझीलंड विरुद्धच्‍या कसोटीत पाच फलंदाज शून्‍यावर बाद झाले.

पहिल्या डावात सर्वाधिक २० धावा पंतच्या नावावर 

भारताने ४० धावांत नऊ विकेट गमावल्या आहेत. ऋषभ पंत २० धावा करून बाद झाला, तर जसप्रीत बुमराह १ धाव काढून माघारी परतला. भारताच्या पहिल्या डावात धावांचा दुहेरी आकडा गाठणारा ऋषभ पंत एकमेक फलंदाज ठरला. पंतला मॅट हेन्रीने आणि बुमराहला विल्यम ओरुरकेने बाद केले. हेन्रीने चार, तर ओरुरकेने तीन विकेट्स घेतल्या आहेत.

अश्विन पाठोपाठ पंतही आऊट

भारताला ३९ धावांवर आठवा धक्का बसला, २० धावा करून ऋषभ पंत बाद झाला.

भारताला सातवा धक्का

लंचनंतर पहिल्याच चेंडूवर मॅट हेन्रीने पहिल्याच चेंडूवर अश्विनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. जडेजानंतर अश्विनलाही खाते उघडता आले नाही.

सहापैकी चार फलंदाजांना उघडता आले नाही खाते! 

दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत भारताने पहिल्या डावात सहा गडी गमावून ३४ धावा केल्या आहेत. आज टॉस जिंकत कर्णधार रोहित शर्मा याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय आतापर्यंत चुकीचा ठरल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. टीम इंडियाने अवघ्या 23.5 षटकांत 34 धावा केल्या असून सहा विकेट गमावल्या आहेत. सहापैकी चार फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. यामध्ये विराट कोहली, सरफराज खान, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. रोहित दोन धावा करून बाद झाला आणि यशस्वी 13 धावा करून बाद झाला. ऋषभ पंत १५ धावा करून नाबाद आहे. न्यूझीलंडसाठी विल्यम ओ'रुर्कने सर्वाधिक तीन बळी घेतले. मॅट हेन्रीला दोन आणि टीम साऊथीला एक विकेट मिळाली.

जडेजाही 'झिरो'वर आऊट

रवींद्र जडेजाही शून्यावर  बाद झाला. २४ व्‍या षटकात मॅट हेन्री याने एजाज पटेल करवी त्‍याला झेलबाद केले. लंच ब्रेकपर्यंत भारताने अवघ्‍या ३४ धावांवर ६ गडी गमावले आहे. न्‍यूझीलंड

केएल राहुलही शून्‍यवर बाद 

विराट, सरफराज पाठोपाठ मध्‍यल्‍या फळीतील फलंदाज केएल राहुलही शून्यावर  बाद झाला. त्‍याला विल्यम ओरोर्क याने बालुंदेल करवी झेलबाद केले. अवघ्‍या ३३ धावांवर भारताचा निम्‍मा संघ तंबूत परतला आहे.

यशस्‍वी जैस्‍वाल १३ धावांवर बाद 

पावसानंतर पुन्‍हा खेळ सुरु झाल्‍यावर २१ व्‍या षटकात भारताला चौथा धक्‍का बसला. यशस्‍वी जैस्‍वाल याला विल्यम ओरोर्क याने एजाज पटेल करवी झेलबाद केले. त्‍याने ६३ चेंडूत १४ धावा केल्‍या.

पावसाच्या व्यत्ययानंतर सामना पुन्हा सुरू

पावसाच्या व्यत्ययानंतर न्‍यूझीलंड विरुद्धचा पहिला कसोटी सामना पुन्हा सुरू झाला आहे. पाऊस थांबला आहे. जेवणाची वेळ दुपारी १२ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. पंतने ओ'रुर्केच्या पहिल्याच चेंडूला चौकार मारला. भारताची धावसंख्या सध्या तीन विकेट्सवर १७ धावा आहे. पॅटसोबत यशस्वी जैस्वाल क्रीझवर आहे.

पावसामुळे खेळ थांबला

पावसामुळे खेळ थांबला आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सध्या जोरदार पाऊस पडत आहे १२.४ षटकानंतर भारताची धावसंख्या ३ बाद १३ धावा अशी आहे. यशस्वी जैस्वाल ८ तर ऋषभ पंत ३ धावांवर खेळत आहे.

विराट पाठोपाठ सरफराजही शून्यावर आऊट

भारताला १० व्‍या षटकात सलग तिसरा धक्‍का बसला, हेन्रीने सरफराज खान याला कवाईकरव झेल बाद केले. सरफराज खानही शून्यावर  बाद झाला आहे.

रोहित पाठोपाठ विराटही माघारी

नवव्‍या षटकात भारताला दुसराला धक्‍का बसला. रर्केच्‍या गोलंदाजीवर ग्‍लेन फिलिप्‍सने उत्‍कृष्‍ट झेल घेत विराटला तंबूत धाडले. त्‍याला धावांचे खातेही उघडता आले नाही. तो शून्यावर  बाद झाला.

भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा माघारी

भारताला सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पहिला धक्का बसला. साउदीने रोहित शर्माला क्लीन बोल्ड केले. रोहित केवळ २ धावा काढून माघारी परतला. भारताने ७ षटकांत १ बाद ९ धावा केल्या होत्या.

टीम इंडियाचा Playing XI संघ

टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), केएल राहुल, सरफराज खान, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, जसप्रीम बुमराह यांचा समावेश आहे.

logo
Pudhari News
pudhari.news