INDvsNZ Test Live : कोहली बाद, तिस-या दिवसाचा खेळ संपला; भारत 125 धावांनी मागे
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटच्या चेंडूवर भारताने सेट फलंदाज विराट कोहलीची (70) विकेट गमावली. कोहली आणि सरफराज खान यांच्यात चांगली भागीदारी सुरू होती. मात्र, ग्लेन फिलिप्सने कोहलीला बाद करून ही भागिदारी तोडली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने दुसऱ्या डावात 3 बाद 231 धावा केल्या. भारत अजूनही 125 धावांनी पिछाडीवर आहे. खेळ संपला तेव्हा सरफराज खान सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 78 चेंडूत 70 धावा करून क्रीजवर आहे.
कोहलीच्या कसोटीत नऊ हजार धावा पूर्ण
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये नऊ हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो भारताचा चौथा फलंदाज ठरला आहे.
टीम इंडियाचे चोख प्रत्युत्तर
दोन विकेट्स गमावल्यानंतर विराट कोहली आणि सरफराज खान यांनी भारतीय डावाची धुरा सांभाळी. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.
कोहलीचे अर्धशतक
सरफराज खाननंतर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनेही अर्धशतक झळकावले. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे 31 वे अर्धशतक आहे.
सरफराज खानचे अर्धशतक
सरफराज खानने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी केली. त्याने अर्धशतक झळकावले. सरफराजने 42 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील चौथे अर्धशतक ठरले आहे.
कोहली-सरफराजची अर्धशतकी भागीदारी
दोन विकेट्स गमावल्यानंतर विराट कोहली आणि सरफराज खान यांनी भारतीय डावाची धुरा सांभाळी. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहितच्या विकेट्स गमावल्यानंतर कोहली आणि सरफराजने शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले.
अर्धशतकी खेळी करुन रोहित शर्मा माघारी
एजाज पटेलने रोहित शर्माला क्लीन बोल्ड केले. रोहित ६३ चेंडूत ५२ धावा करुन माघारी परतला. यामुळे भारताची अवस्था २२ षटकांत २ बाद ९५ धावा अशी होती.
भारताला पहिला धक्का
दुसऱ्या डावात भारताला पहिला धक्का ७२ धावांवर बसला. एजाज पटेलने यशस्वी जैस्वालला यष्टिरक्षक ब्लंडेलकरवी झेलबाद केले. त्याला ५२ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ३५ धावा करता आल्या. सध्या रोहित आणि विराट कोहली क्रीजवर आहेत. विराट पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. पहिल्या डावात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याला खातेही उघडता आले नाही.
टीम इंडियाने दुसऱ्या डावाची चांगली सुरुवात
टीम इंडियाने दुसऱ्या डावाची चांगली सुरुवात करत ११ षटकांत ४१ धावा केल्या. रोहित शर्माने ३२ चेंडूत २२ धावा केल्या आहेत. तर यशस्वी जैस्वालने ३६ चेंडूत १८ धावा केल्या आहेत.
न्यूझीलंडचा पहिला डाव ४०२ धावांवर संपुष्टात
कुलदीप यादवने एजाज पटेलला पायचित केले. त्यानंतर कुलदीपच्या फिरकीत रचिन रविंद्रही अडकला. कुलदीपने रचिनना झेलबाद केले. ध्रुव जुरेलने त्याचा झेल टिपला. यामुळे न्यूझीलंडने पहिल्या डावात सर्वबाद ४०२ धावा केल्या असून त्यांनी टीम इंडिया विरुद्ध ३५६ धावांची आघाडी घेतली आहे.
सिराजला यश, साउदी झेलबाद
दुसऱ्या सत्रात सिराजने टीम साउदीला झेलबाद केले. साउदी ७३ चेंडूत ६५ धावा काढून माघारी परतला. यामुळे न्यूझालंडने ८७ व्या षटकांत ८ बाद ३७० धावा केल्या होत्या. न्यूझीलंडने भारताविरुद्ध ३२५ धावांची आघाडी घेतली आहे.
टीम साउदीचे अर्धशतक
रचिन रविंद्रचे (Rachin Ravindra) शतक आणि टीम साउदीच्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडन भारता विरुद्ध भक्कम आघाडी घेतली आहे. टीम साउदी ६५ धावांवर खेळत आहे. यामुळे न्यूझीलंडची टीम इंडिया विरुद्ध आघाडी ३०० पार झाली आहे.
रचिन रविंद्रचे शतक, न्यूझीलंड भक्कम आघाडीच्या दिशेने
रचिन रविंद्रने शतकी खेळी करत न्यूझीलंडला टीम इंडिया विरुद्ध लंच ब्रेकपर्यंत २९९ धावांची आघाडी मिळवून दिली. ११ चौकार आणि २ षटकार ठोकत रचितने दमदार शतक पूर्ण केले. लंचब्रेकपर्यंत न्यूझीलंडने ७ बाद ३४५ धावा केल्या होत्या. २०१२ मध्ये याच मैदानावर रॉस टेलरने ११३ धावांची खेळी केली होती. त्यानंतर रचिन रवींद्र या न्यूझीलंड फलंदाजाचे हे पहिले शतक आहे.
रचिन रविंद्रचे अर्धशतक
कुलदीप यादवच्या चेंडूवर चौकार मारत रचिन रविंद्र याने अर्धशतक पूर्ण केले. रचिन रविंद्रच्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने २०० च्यावर धावांची आघाडी घेतली.
जडेजाने न्यूझीलंडला आणखी एक धक्का
जडेजाने न्यूझीलंडला आणखी एक धक्का देत मॅट हेन्रीला क्लीन बोल्ड केले. मॅट हेन्रीला केवळ ८ धावा करता आल्या.
जडेजाच्या चेंडूवर फिलिप्स क्लीन बोल्ड
६३ व्या षटकांच्या तिसऱ्या चेंडूवर रविंद्र जडेजाने ग्लेन फिलिप्सला क्लीन बोल्ड केले. फिलिप्स १४ धावा काढून तंबूत परतला. यामुळे ६३ षटकांत न्यूझीलंडने ६ गडी गमावून २२३ धावा केल्या होत्या. भारतावर त्यांनी १७७ धावांची आघाडी घेतली होती. रचीन रविंद्रची अर्धशतकाकडे वाटचाल सुरु आहे.
बुमराहने न्यूझीलंडला दिला पाचवा धक्का
सिराज पाठोपाठ बुमराहने न्यूझीलंडला पाचवा धक्का दिला. बुमराहच्या चेंडूवर टॉम ब्लंडेल झेलबाद झाला. केएल राहुलने त्याचा झेल टिपला.
सिराजने मिशेलला माघारी पाठवले
पहिल्या सत्रातील खेळाच्या सुरुवातीला सिराजने डेरिल मिशेलला झेलबाद केले. जैस्वालने त्याचा झेल टिपला. मिशेल १८ धावा काढून माघारी परतला. यामुळे न्यूझीलंडने ५७ षटकांत ४ बाद २०४ धावांवर खेळत १५८ धावांची आघाडी घेतली होती.
IND vs NZ 1st Test Day 3 Updates
रचिन रविंद्रच्या (१३४ धावा) शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडने भारताविरुद्ध ३५६ धावांची आघाडी घेतली. न्यूझीलंडचा पहिला डाव आज ४०२ धावांवर आटोपला. न्यूझीलंडकडून रचिन रविंद्रने शतक, डेव्हन कॉन्वे (९१ धावा) आणि टीम साउदी (६५ धावा) यांनी अर्धशतके केली. टीम इंडियाकडून कुलदीप यादव, रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी ३, सिराज २, बुमराह आणि अश्विन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा आज शुक्रवारी (दि.१८) तिसरा दिवस आहे. आज न्यूझीलंडने ३ बाद १८० धावांवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. पहिल्या डावात भारताला ४६ धावांत गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडने चांगली फलंदाजी केली. बंगळूर येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना सुरु आहे.

