

लंडन : भारताचा रविंद्र जडेजा बाद झाल्यानंतर भारताच्या तळाचे फलंदाज एकअंकी धावसंख्या काढू शकले नाहीत. आकाशदीप ७ धावा काढून बाद झाला त्यांनंतर बुमराह शुन्यावर बाद झाला.त्यानंर शेवटची विकेट ही वॉशिग्टन सुंरची पडली. त्याने २३ धावांचे योगदान दिले. वैशिष्ठ्य म्हणजे भारताची धावसंख्याही ३८७ झाली. जी अगदी इंग्लडच्या धावसंख्येएवढी होती.
भारताच्या तळाचे फलंदाज एकअंकी धावसंख्या काढू शकले नाही. आकशदीप पाठोपाठ वोक्सने बुमराहची विकेट घेतली बुमराहला एकही धाव काढता आली नाही. दरम्यान भारताची धावसंख्या ३८७ झाली असून इंग्लडशी बरोबरी साधली आहे. आकशदीपने सात धावा काढल्या.
वोक्सच्या गोलंदाजीवर आकशदीप याला सलग दोनवेळा जीवदान मिळाले. पायचीतचे अपील दोनवेळा सलग दोन चेंडूत केले. अंपायरने सलग दोनवेळा आऊट दिले होते. पण दोनवेळा डिआरएस घेण्यात आले. दोन्ही वेळा तो नॉट आऊट राहीला. जडेजा बाद झाल्यानंतर तो खेळायला आला होता. एकही धाव त्याने घेतली नव्हती.
भारताला ७ वा धक्का बसला असून रविंद्र जडेजा तंबूत परला असून. वोक्सच्या गोलंदाजीवर जडेजा आऊट झाल असून विकेटकिपर जेमी स्मिथने त्याचा झेल घेतला. जडेजाने ७२ धावा करत भारताचा धावफलक हलता ठेवला.
भारताने इंग्लविरोधतील पहिल्याच डावा ३५० धावांचा टप्पा गाठला असून इंग्लडच्या धावसंख्या गाठत आले आहे ११ धावांनी भारत पिछाडीवर आहे. इंग्लडने पहिल्या डावात ३८५ धावा केल्या आहेत. रविंद्र जडेजा व वॉशिंग्टन सुंदर खेळत आहेत. जडेजाने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे.
बेन स्टोक्सने नितीश रेड्डीला बाद केले, त्याच्या गोलंदाजीवर जेमी स्मिथने रेड्डीचा झेल घेतला!! स्टोक्सच चेंडूवर नितीश रेड्डी ने बॅटने हलका टच केला. बॅटच्या काठावर लागून बॉल थेट किपरकडे गेला. इंग्लंडला या वेळी विकेटची गरज होती आणि कर्णधाराने ती मिळवून दिली. नितीश रेड्डी ९१ चेंडूंत ३० धावा काढून बाद झाला
भारताचा शतकवीर के. एल. राहुल शतक झळकावल्यानंतर लगेचच बाद झाला. हॅरी ब्रुकने शोएब बशीरच्या गोलंदाजीवर त्याचा झेल घेतला. राहुलने 177 चेंडूत 100 धावा केल्या.
पहिल्या सत्रात भारताचे पूर्णपणे वर्चस्व राहिले. पण लंच ब्रेकच्या आधी शेवटच्या षटकात ऋषभ पंत धावबाद होऊन माघारी परतला. दुसरीकडे, केएल राहुल अजूनही मैदानात टिकून आहे. दरम्यान, बाद होण्यापूर्वी, ऋषभ पंतने इंग्लंडमधील विव रिचर्ड्सचे षटकारांचे रेकॉर्ड मोडले. तो इंग्लंडमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा परदेशी फलंदाज बनला.
पंत आणि केएल राहुलने चौथ्या विकेटसाठी १४१ धावांची भागीदारी केली. भारताच्या डावाची ही पहिली शतकी भागीदारी आहे. पहिल्या डावात भारत इंग्लंडपेक्षा १३९ धावांनी मागे आहे. केएल राहुल शतकापासून केवळ दोन धावांनी दूर आहे.
बशीरच्या चेंडूवर धाव घेताना ऋषभ पंतला बेन स्टोक्सने धावबाद केले. पंतने ११२ चेंडूत ७४ धावांची खेळी केली. यात २ षटकार आणि ८ षटकारांचा यात समावेश आहे. केएल राहुल ९८ धावांवर खेळत आहे. लंच ब्रेकपर्यंत भारताने ४ बाद २४८ धावांपर्यंत मजल मारली.
केएल राहुल (Rishabh Pant) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्यात १०० धावांची भागीदारी झाली आहे. पंतने स्टोक्सच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले. त्याने ८६ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. तर केएल राहुल ८९ धावांवर खेळत आहे. यामुळे भारताने ६० षटकांत ३ बाद २२१ धावांपर्यंत माजली मारली आहे.
केएल राहुल आणि ऋषभ पंत जोडीने डाव सावरला आहे. यामुळे भारताने ५७ षटकांत ३ बाद २०० धावा केल्या. पंत अर्धशतकाच्या जवळ पोहोचला आहे. तर केएल राहुल ७९ धावांवर खेळत आहे.
केएल राहुलने ब्रायडन कार्सच्या शेवटच्या षटकात चौकारांची हॅटट्रिक केली. त्याने षटकातील शेवटच्या तीन चेंडूंवर चौकार ठोकले. यामुळे भारत २०० धावांच्या जवळ पोहोचला.
५० षटकांत भारताने ३ बाद १५९ धावांपर्यंत मजल मारली आहे. केएल राहुल ५४ धावांवर तर ऋषभ पंत ३१ धावांवर खेळत आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटीचा आज शनिवारी (दि.१२ जुलै) तिसरा दिवस आहे. इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद ३८७ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर भारताने शुक्रवारी दुसर्या दिवसअखेर ३ बाद १४५ धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. तिसऱ्या दिवशी इंग्लंडवर आघाडी घेण्याचा भारताचा प्रयत्न आहे.