IND vs BAN 2nd Test | भारताचा बांगला देशवर ७ गडी राखून विजय

भारताने कसोटी मालिका २-० ने घातली खिशात
IND vs BAN Test
बुमराहने बांगला देशला आणखी एक धक्का देत तैजुल इस्लामला पायचित केले. (Image source- BCCI)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कानपूर येथील दुसऱ्या कसोटीत (India vs Bangladesh 2nd Test) भारताने बांगला देशवर ७ गडी राखून विजय मिळवला. यामुळे भारताने ही कसोटी मालिका २-० ने खिशात घातली. दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने अर्धशतकी खेळी केली. तर विराट कोहली २९ धावांवर आणि ऋषभ पंत ४ धावांवर नाबाद राहिला. कानपूर कसोटी सामन्यातील सोमवारी चौथ्या दिवशी भारतीय संघाने बांगला देशचा पहिला डाव २३३ धावांत आटोपला होता. दरम्यान, आज सोमवारी बांगला देशचा दुसरा डाव १४६ धावांवर गुंडाळला. यामुळे भारताला विजयासाठी ९५ धावांची गरज होती. हे लक्ष्य भारताने ३ गडी गमावत पूर्ण केले.

भारताने सोमवारी आपला पहिला डाव ९ बाद २८५ धावांवर घोषित केला होता. त्यानंतर सोमवारी दिवसअखेर बांगला देशने दुसऱ्या डावात २ बाद २६ धावा केल्या होत्या. आज मंगळ‍वारी बांगला देशने दुसरा डाव २ बाद २६ धावांवरुन पुढे खेळला. पण पहिल्या सत्रात बांगला देशला एकामागोमाग एक असे धक्के बसले. यामुळे त्यांचा दुसरा डाव सर्वबाद १४६ धावांवर आटोपला. बुमराह, अश्विन आणि जडेजा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तर आकाश दीपने १ विकेट घेतली. आर अश्विन याला त्याच्या शानदार अष्टपैलू कामगिरीसाठी मालिकावीर पुरस्कार मिळाला. तर कानपूरमधील दुसऱ्या कसोटीत सलग अर्धशतकी खेळी करणाऱ्या यशस्वी जैस्वालला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

यशस्वी जैस्वालची अर्धशतकी खेळी

१६ व्या षटकांत तैजुल इस्लामच्या चेंडूवर यशस्वी जैस्वाल ५१ धावांवर आऊट झाला. जैस्वालने ४४ चेंडूत अर्धशतकी खेळी केली.

भारताला पाठोपाठ दोन धक्के, रोहित, शुभमन माघारी

मेहदी हसनने पाठोपाठ आणखी एक विकेट घेतली. हसनने पाचव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर शुभमन गिलला पायचित ( Lbw) केले. यामुळे भारताची ५ षटकांत २ बाद ३५ धावा अशी अवस्था झाली.

भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा आऊट

दुसऱ्या सत्रात भारताचा दुसरा डाव सुरु होताच तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मेहदी हसनने रोहित शर्माची विकेट घेतली. रोहित ७ चेंडूत ८ धावा काढून माघारी परतला.

बुमराहने मुशफिकूरला केले क्लीन बोल्ड

बुमराहने मुशफिकूरला क्लीन बोल्ड केल्याने बांगला देशचा दुसरा डाव १४६ धावांवर गुंडाळला. बांगला देशकडे ९४ धावांची आघाडी असून भारताला विजयासाठी ९५ धावांचा गरज आहे.

बुमराहचा बांगला देशला आणखी एक धक्का

बुमराहने बांगला देशला आणखी एक धक्का देत तैजुल इस्लामला पायचित केले. यामुळे ४१ षटकांत बांगला देशची अवस्था ९ बाद १३० झाली होती.

बांगला देशला आठवा धक्का, बुमराहने घेतली मेहदी हसनची विकेट

३७ व्या षटकांत बांगला देशला आठवा धक्का बसला. बुमराहच्या चेंडूवर मेहदी हसन मेराजने यष्टीरक्षक पंतकडे सोपा झेल दिला. मेहदी हसनला केवळ ९ धावा करता आल्या. यामुळे ३७ षटकांत बांगला देशची अवस्था ८ बाद ११८ धावा अशी होती.

जडेजाच्या फिरकीच्या जाळ्यात शाकिब अडकला

बांगला देशला सलग चौथा धक्का बसला. जडेजाच्या फिरकीच्या जाळ्यात अडकलेल्या शाकिबने जडेजाच्या हातात सोपा झेल दिला. शाकिब अल हसन शुन्यावर बाद झाला. यामुळे बांगला देशची अवस्था ३२ षटकांत ७ बाद ९४ धावा अशी झाली होती.

सलग ३ षटकांत बांगला देशने ३ विकेट गमावल्या

३० व्या षटकांत जडेजाने बांगला देशला सहावा धक्का दिला. जडेजाने लिटन दासची विकेट घेतली. त्या झेल पंतने टिपला. सलग ३ षटकांत बांगला देशने ३ विकेट गमावल्या. यामुळे भारताने निर्णायक आघाडी घेतली.

बांगला देशला पाठोपाठ धक्के, शादमान इस्लाम अर्धशतक करुन माघारी

२८ व्या षटकांच्या दुसऱ्या चेंडूवर जडेजाने नजमुल हुसैन शांतो याला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर लगेच बांगला देशला पाचवा धक्का बसला. आकाश दीपने शादमान इस्लामला झेलबाद केले. जैस्वालने त्याचा झेल टिपला. शादमान इस्लामने अर्धशतकी (५० धावा) खेळी केली.

अश्विनने मोमिनूलला पाठवले माघारी

भारत आणि बांगला देश यांच्यात कानपूर येथील ग्रीन पार्क येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या सोमवारी चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगला देशने २ बाद २६ धावा केल्या होत्या. त्यानंतर आज मंगळवारी सुरूवातीला १४ व्या षटकांत अश्विनने मोमिनूलची विकेट घेतली. राहुलने लेग स्लिपवर त्याचा झेल टिपला. यामुळे बांगला देशची अवस्था ३ बाद ४२ झाली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news