IND vs NZ : न्युझीलंडसोबतच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

जसप्रीत बुमराह भारतीय संघाचा उपकर्णधार
IND vs NZ Test Series
न्युझीलंडसोबतच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा BCCI X Handle
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यात 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. यानंतर टीम इंडिया कसोटी मालिकेत न्यूझीलंडचे यजमानपद भूषवणार आहे. टीम इंडियाला बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. आता या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडियात एक बदल झाला आहे. मोहम्मद शमीला या मालिकेत स्थान मिळेल, अशी अपेक्षा होती, पण त्यालाही संधी मिळाली नाही. (IND vs NZ)

बुमराहला उपकर्णधार बनवले

जसप्रीत बुमराहला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर यश दयाल याला संघात स्थान मिळालेले नाही. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला होता, मात्र त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. (IND vs NZ)

न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप

भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंड संघ

टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (फक्त पहिली कसोटी), मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, विल ओ'रुर्के, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, बेन सीयर्स, ईश सोधी (केवळ दुसरी आणि तिसरी कसोटी), टीम साऊदी, केन विल्यमसन, विल यंग. (IND vs NZ)

भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेचे पूर्ण वेळापत्रक

  • भारत विरुद्ध न्यूझीलंड, पहिला कसोटी सामना: १६ ऑक्टोबर, बेंगळुरू

  • भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुसरा कसोटी सामना: २४ ऑक्टोबर, पुणे

  • भारत विरुद्ध न्यूझीलंड, तिसरा कसोटी सामना: १ नोव्हेंबर, मुंबई

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news