India-Pakistan match
चॅम्‍पियन ट्रॉफीमधील आजचा सामना पाकिस्‍तान संघाचे स्‍पर्धेतील अस्‍तित्‍व ठरवणारा आहे.File Photo

... तर पाकिस्‍तान चॅम्‍पियन ट्रॉफीतून 'आऊट' होणार! जाणून घ्‍या 'सेमीफायनल'चे समीकरण

India-Pakistan match : गुणतालिकेत पाकिस्‍तान संघाची पाटी कोरीच
Published on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : चॅम्‍पियन ट्रॉफीमध्‍ये आज भारत आणि पाकिस्‍तान संघ आमने-सामने आहेत. या सामन्‍याकडे संपूर्ण क्रिकेट विश्‍वाचे लक्ष वेधले आहे. आजचा सामना भारताने जिंकला तर ट्रॉफीतील सेमी फायनलचे तिकिट निश्‍चित होणार आहे. मात्र आज पराभव झाला तर पाकिस्‍तानचा संघाची चॅम्‍पियन ट्रॉफीतील वाट खडतर होणार आहे. जाणून घेवूया चॅम्‍पियन ट्रॉफीतील सेमीफायनलच्‍या समीकरणाविषयी...

आज पाकिस्तान हरला तर काय होईल?

चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा ६० धावांनी पराभव केला. न्यूझीलंड संघाला गट अ मध्ये २ गुण मिळाले, तर पाकिस्तान संघाची पाटी कोरी आहे. पहिल्या सामन्यानंतर पाकिस्तानला नेट रन रेट -१,२०० पर्यंत घसरला आहे. याचा अर्थ एक गोष्ट निश्चित आहे की पाकिस्तानला येथून उपांत्य फेरी गाठणे आणखी खडतर हाेणारआहे.

'जर-तर'चे समीकरण

पाकिस्‍तान संघ आजचा सामना पराभूत झाला तर न्यूझीलंड संघाने उर्वरित सामने गमावावेत, अशी प्रार्थना त्‍यांना करावी लागले. तसेच बांगलादेशविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागले. त्यानंतरही सेमी फायनलमध्‍ये कोणता संघ धडक मारणार हे नेट रन रेटवरच ठरेल. ग्रुप अ मध्ये पाकिस्तान संघ २७ फेब्रुवारी रोजी बांगलादेशचा सामना करेल; पण इथून पुढे त्यांना दोन्ही सामने चांगल्या रन रेटने जिंकावे लागतील. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये प्रत्येक विजयासाठी संघांना दोन गुण दिले जातील.गट फेरीत सामना बरोबरीत राहिल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. जर गट फेरीनंतर संघांचे गुण समान असतील, तर नेट रन रेटच्या आधारे संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news