IND VS AUS 4th Live : मेलबर्नमध्ये 300+ धावांचे लक्ष्य फक्त एकदाच चेस; पाचव्या दिवशी भारत इतिहास रचणार?

चौथी कसोटी जिकंण्यासाठी भारतासमोर मोठे आव्हान
IND VS AUS 4th Live
पाचव्या दिवशी भारत इतिहास रचणार?Pudhari Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नमध्ये खेळला जात आहे. या बॉक्सिंग डे कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 9 गडी गमावून 228 धावा केल्या आहेत. पहिल्या डावाच्या आधारे त्यांच्याकडे 105 धावांची आघाडी होती. अशा स्थितीत संघाची एकूण आघाडी 333 धावांची झाली आहे. मेलबर्नमध्ये आतापर्यंत 300 हून अधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी फक्त एकदाच यशस्वी झाला आहे.

IND VS AUS 4th Live
मेलबर्न कसोटीत यशस्वी धावांचा पाठलागPudhari Photo

या कसोटीच्या पाचव्या दिवशी भारताला मेलबर्नमध्ये इतिहास रचण्याची संधी आहे. त्याकरिता या मैदानावर सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. याआधी 1928 मध्ये इंग्लंडने कांगारुंच्या विरुद्ध मेलबर्न कसोटीत 332 धावांचा सर्वात यशस्वी पाठलाग केला होता. या सामन्यात 300 हून अधिक धावांचे लक्ष्य यशस्वीपणे पार केले गेले. सोमवारी 98 षटकांचा सामना होणार आहे. सुरुवातीच्या सत्रात टीम इंडिया ऑस्ट्रेलियन इनिंगला रोखू शकते की नाही हे पाहणे बाकी आहे.

IND VS AUS 4th Live | लियोन-बोलंड भागीदारीमुळे नुकसान

चौथ्या दिवशी स्कॉट बोलँड आणि नॅथन लायन यांच्या शानदार फलंदाजीमुळे भारताची विकेट्ससाठी तळमळ उडाली. आतापर्यंत दोघांनी 110 चेंडूत 10व्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली आहे. लियॉन 41 धावांवर नाबाद असून बोलंड 10 धावांवर नाबाद आहे. ऑस्ट्रेलियाला 173 धावांवर नववा धक्का बसला. कांगारूंनी पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव रविवारीच 369 धावांवर संपला. लियॉन आणि बोलँडच्या भागीदारीमुळे भारताचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. 110 चेंडू म्हणजेच दोघांनी मिळून सुमारे 18 षटके खेळली आहेत. दिवसाच्या शेवटच्या षटकात टीम इंडियालाही संधी मिळाली, पण बुमराहचा तो चेंडू नो बॉल होता. बुमराहचा नो बॉल लियॉनच्या बॅटच्या काठाला लागला आणि चेंडू स्लिपमध्ये गेला. राहुलनेही झेल घेतला, पण नो बॉलमुळे लियॉनला जीवदान मिळाले.

IND VS AUS 4th Live | ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी खराब होती. मार्नस लॅबुशेनने सर्वाधिक 70 धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार पॅट कमिन्सने 41 धावांची खेळी केली. याशिवाय लियॉनने धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या पाच फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. यामध्ये सॅम कॉन्स्टास (8), ट्रॅव्हिस हेड (1), मिचेल मार्श (0), ॲलेक्स कॅरी (2) आणि मिचेल स्टार्क (5) यांचा समावेश आहे. उस्मान ख्वाजा 21 धावा करून बाद झाला तर स्टीव्ह स्मिथ 13 धावा करून बाद झाला. भारताकडून आतापर्यंत बुमराहने चार आणि सिराजने तीन विकेट्स घेतल्या आहेत. रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली.

IND VS AUS 4th Live  | भारताचा पहिला डाव

तत्पूर्वी, रविवारी भारताने नऊ विकेट्सवर 358 धावांवर खेळ सुरू केला आणि 11 धावांची भर घालताना उर्वरित एक विकेट गमावली. शेवटची विकेट म्हणून नितीश रेड्डी बाद झाला. त्याला स्टार्कच्या हाती नॅथन लिऑनने झेलबाद केले. नितीशने जवळपास २७९ मिनिटे मैदानावर घालवली. त्याने सिराजसोबत शेवटच्या विकेटसाठी 36 चेंडूत 19 धावांची भागीदारी केली. नितीशने वॉशिंग्टन सुंदरसोबत आठव्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी केली. सुंदर आणि नितीश दोघांनी 150-150 चेंडू खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच एका संघातील आठव्या आणि नऊ क्रमांकाच्या फलंदाजांनी 150+ चेंडू खेळले आहेत.

दोघांनी मिळून 285 चेंडू खेळले, म्हणजे सुमारे 48 षटके फलंदाजी केली. सुंदर 162 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 50 धावा करून बाद झाला. तत्पूर्वी, यशस्वी जैस्वाल ८२ धावा केल्यानंतर, रोहित शर्मा तीन धावा केल्यानंतर, केएल राहुल २४ धावा केल्यानंतर, विराट कोहली ३६ धावा केल्यानंतर, ऋषभ पंत २८ धावा केल्यानंतर आणि रवींद्र जडेजा १७ धावा करून बाद झाले. जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप खातेही उघडू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स, स्कॉट बोलँड आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. यशस्वी धावबाद झाला.

IND VS AUS 4th Live | ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 474 धावांवर संपला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. यानंतर स्टीव्ह स्मिथने कसोटी कारकिर्दीतील ३४ वे शतक झळकावले. कर्णधार पॅट कमिन्सने 49 धावांची खेळी केली. स्मिथ 140 धावा करून आकाश दीपच्या चेंडूवर बाद झाला. त्याने 197 चेंडूत 13 चौकार आणि तीन षटकार ठोकले. तत्पूर्वी, सॅम कॉन्स्टास 65 चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 60 धावा करून बाद झाला.

ख्वाजाने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 27 वे अर्धशतक झळकावले. 121 चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने 57 धावा करून तो बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याच वेळी, हेड खाते उघडू शकले नाही. त्याला बुमराहने क्लीन बोल्ड केले. त्यानंतर बुमराहने मिचेल मार्शला स्वस्तात बाद केले. त्याला चार धावा करता आल्या. लॅबुशेनने 145 चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने 72 धावांची खेळी केली. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे 22 वे अर्धशतक होते. यानंतर जडेजाने कमिन्स (49) तसेच मिचेल स्टार्कला क्लीन बोल्ड केले. स्टार्क 15 धावा करू शकला. शेवटची विकेट नॅथन लायनच्या रूपाने पडली. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर रवींद्र जडेजाने तीन विकेट घेतल्या. आकाश दीपने दोन, तर सुंदरने एक विकेट घेतली. या सामन्यासाठी दोन्ही संघात प्रत्येकी एक बदल करण्यात आला. ऑस्ट्रेलियाने जोश हेझलवूडच्या जागी स्कॉट बोलंडला आणि भारताने शुभमन गिलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news