
पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शेवटच्या दोन षटकांत भारताकडून दक्षिणआफ्रिकेने सामना अक्षरक्ष: काढून घेतला. जेराल्ड कोएत्झी याने भारताच्या सामना जिंकण्याच्या आशा धुळीस मिळवल्या. आठव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या कोएत्झी याने भारताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. ९ चेंडू वर १९ धावा करत भारताचा विजय हिरावून घेतला. त्याला ट्रिस्टन स्टब्सने चांगली साथ दिली. अर्शदिप सिंग व आवेश खान यांची शेवटची षटके अतिशय खराब पडली. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना ट्रिस्टन स्टब्सने एकाकी लढत देत नाबाद ४७ धावा केल्या. भारताकडून सर्वाधिक ५ बळी घेत वरुण चक्रवर्तीने सामन्यात रंगत आणली.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज गकेबेहरा झाला. दक्षिण आफ्रिका संघाने टॉस जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. भारताने संघात कोणताही बदल केला नव्हता. तर दक्षिण आफ्रिकेच्या संघात क्रुगरच्या जागी रीझा हेंड्रिक्सला संधी देण्यात आली होती. आता दोन्ही संघानी एक - एक सामना जिंकला आहे.
दुसरा टी-२० सामना अतिशय रंजक स्थितीत आला असून आफ्रिकेसाठी सोपी वाटणारी ही लढत अवघड ठरत आहे. सामना कोणाकडे फिरेल हे सांगता येत नाही. शेवटची तीन षटके राहिली असून. कोणाचे पारडे जड होते हे पाहणे रंजक ठरत आहे.
हा सामना रंगतदार होत असून आफ्रिकेचे पाठोपाठ गडी तंबूत परतत आहे. वरुण चक्रवर्तीने सलग दोन बळी घेतले आहेत. सुरवातीला सोपे वाटणारे आव्हान बळी जाईल तसे अवघड होत आहे. वरुण चक्रवर्तीने टिच्चून मारा करत एकूण पाच बळी घेतले आहे. ट्रिस्टन स्टब्स सध्या १४ धावांवर खेळत आहे.
आफ्रिकेचा तिसरा बळीः रीझा हेंड्रिक्स २४ धावांवर बाद. वरुण चक्रवर्तीने रीझा हेंड्रिक्सला त्रिफळाचित केले. ९ वे षटक सुरु असून आफ्रिकेची धावसंख्या ४५ इतकी झाली आहे. वरुण चक्रवर्तीने त्याच्या पहिल्याच षटकात कर्णधार एडन मार्कराम याला केवळ ३ धावांवर त्रिफळाचित केले.
साऊथ आफ्रीकेने डावाची सुरवात सावध केली आहे. सलामीला रायन रिक्लेटन व रीझा हेंड्रिक्स यांनी २२ धावांची भागिदारी केली आहे. अर्शदिपने रायन रिक्लेटनला 3 षटकात बाद केले. रायन रिक्लेटन ने १३ धावा केल्या रिकूं सिंगने त्याचा झेल टिपला.
भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकात १२४ धावा करत. साऊथ आफ्रीकेसमोर केवळ १२५ धावांचे सोपे आव्हान ठेवले आहे. भारताचा डाव पहिल्या षटकापासूनच गडगडला होता. सर्वच फलंदाज अपयशी ठरले. आफ्रिकेच्या गोलदांजासमोर भारताचा संघ अपयशी ठरला. डेव्हिड मिलर, मार्को जेन्सेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, नाकाबायोमझी पीटर यांनी टिच्चून गोलंदाजी केली. केवळ हार्दिक पांड्याने ३९ धावा केल्या.
भारताच्या फलंदाजांची हाराकीरी, केवळ ९० धावांच्या आत अर्धा संघ माघारी फिरला असून. केवळ अक्षर पटेल व तिलक वर्मा या दोघांना कोणत्याही फलंदाजांना दोन अंकी धावसंख्या उभारता आली नाही. अक्षर पटेल २७ धावा करुन बाद झाला तर तिलक वर्मा २० धावांवर बाद झाला. . हार्दिक पटेल २९ धावांवर खेळत आहे, अर्शदीपसिंग ६ धावांवर खेळत आहे. १८ वे षटक सरु असून १११ धावा भारताच्या झाल्या आहेत.
भारताला ६ वा धक्का बसला असून रिंकू सिंग केवळ ९ धावा करुन झेलबाद झाला. पीटर याच्या गोलंदाजीवर जेराल्ड कोएत्झी ने झेल घेतला.
भारतीय संघाचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. अष्टपैलू अक्षर पटेल 12व्या षटकातील पाचव्या चेंडूवर धावबाद झाला. त्याने 21 चेंडूत 4 चौकारांसह 27 धावांची खेळी केली.
अक्षर पटेल 27 धावांवर धावबाद झाला. चोरटी धाव घेण्याच्या नादात ता पीटर याची गोलंदाजी सुरु असताना धावबाद झाला.अक्षर पटेल १९ व हार्दिक पंड्या १ धावसंख्येवर खेळत आहेत. ९ वे षटक सुरु आहे
कर्णधार सुर्यकुमार याला आजच्या सामन्यातही छाप पाडता आली नाही. केवळ ९ चेंडू खेळून तो ४ धावा करुन बाद झाला. त्यनंतर तिलक वर्मा केवळ २० धावा करुन बाद झाला. आयडेल मार्कमच्या गोलंदाजीवर त्याचा डेव्हीड मिलरने झेल घेतला.
भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आहे. गेल्या सामन्यात शतक झळकावणारा संजू सॅमसन शून्यावर बाद झाला. पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मार्को जॅनसेनने त्याला आपल्या जाळ्यात पायचीत केले. जॅनसेनने मेडल ओव्हर टाकले.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज गकेबेहरा येथे होत आहे. दक्षिण आफ्रिका संघाने टॉस जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. यजमान संघ मालिका विजयासाठी तर भारतीय संघ आपली आघाडी कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. भारताने संघात कोणताही बदल केलेला नाही. तर दक्षिण आफ्रिकेने संघात एक बदल केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघात क्रुगरच्या जागी रीझा हेंड्रिक्सला संधी देण्यात आली आहे.
भारतीय संघ : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, आवेश खान.
दक्षिण आफ्रिका संघ : एडन मार्कराम (कर्णधार), रायन रिक्लेटन, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को जेन्सेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, नाकाबायोमझी पीटर.