

IND vs SA 2nd Test Day 2 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस संपला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या मधल्या फळीने भारतीय गोलंदाजांची सत्त्वपरीक्षा पाहिली. दिवसाच्या खेळाच्या शेवटी, भारताने पहिल्या डावात नऊ धावा केल्या आणि सध्या दक्षिण आफ्रिकेपेक्षा ४८० धावांनी पिछाडीवर आहे. खेळ संपला तेव्हा, यशस्वी जयस्वाल सात धावांसह आणि केएल राहुल दोन धावांसह क्रिजवर होते. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ४८९ धावा केल्या होत्या.पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेला बाद केल्यानंतर, यशस्वी आणि राहुल यांनी सावध फलंदाजी केली. खराब प्रकाशामुळे काही अडचणी निर्माण झाल्या, परंतु या दोन्ही सलामीवीरांनी अत्यंत संयमाने फलंदाजी केली. आता सोमवारी (दि. २४) भारतीय फलंदाज दक्षिण आफ्रिकेवर आघाडी घेण्याचे लक्ष्य ठेवून मैदानात उतरतील.
भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने ४८९ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने उत्कृष्ट फलंदाजी दाखवली आणि भारतीय गोलंदाजांना त्रास दिला. दक्षिण आफ्रिकेकडून मुथुस्वामीने शतक झळकावले, तर मार्को जॅन्सन ९३ धावांवर बाद झाला. दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने सहा बाद २४७ धावांवर आपला डाव पुन्हा सुरू केला. मुथुस्वामीने प्रथम व्हेरेनसह सातव्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली आणि नंतर जॅन्सनसह आठव्या विकेटसाठी ९७ धावा जोडल्या.मुथुस्वामीच्या पहिल्या कसोटी शतकामुळे दक्षिण आफ्रिकेला मोठी धावसंख्या उभारता आली. भारताची गोलंदाजी इतकी खराब होती की त्यांना चार विकेट घेण्यासाठी तीन सत्र लागले. तथापि, कुलदीपने जॅन्सनला बाद करून दक्षिण आफ्रिकेचा डाव संपवला. दक्षिण आफ्रिकेकडून मुथुस्वामीने सर्वाधिक १०९ धावा केल्या, तर काइल व्हेरेन ४५ धावांवर बाद झाला. भारताकडून कुलदीप यादवने चार, तर बुमराह, सिराज आणि जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
भारताविरुद्धच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने ४५० धावांचा टप्पा पार केला आहे. .
मोहम्मद सिराजने मुथुस्वामी बाद करून भारताला आठवा विकेट मिळवून दिला. मुथुस्वामी दमदार शानदार फलंदाजी करत होता पण सिराजच्या गोलंदाजीवर यशस्वी जयस्वालने त्याला झेलबाद केले. मुथुस्वामी २०६ चेंडूत १० चौकार आणि दोन षटकारांसह १०९ धावा करून बाद झाला.
भारताविरुद्धच्या पहिल्या डावात मार्को यान्सनने अर्धशतक झळकावले आहे. त्याने मुथुस्वामीबरोबर आठव्या विकेटसाठी दमदार फलंदाजी केली. लंच ब्रेकपर्यंत दक्षिण आफ्रिका संघाने ७ गडी गमावत ४२८ धावा केल्या आहेत.
मुथुसामीने झुंझार फलंदाजीचे प्रदर्शन करत मुथुसामीने शतकी खेळी केली. त्याने १९३ चेंडूचा सामना कसोटी कारकीर्दीतील पहिली शतकी खेळी साकारली. त्याच्या या खेळीने दक्षिण आफ्रिकेने सामन्यात दमदार कमबॅक केले आहे.
काइल व्हेरिन बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या यान्सने झुंजार खेळीचे प्रदर्शन केले. त्याने फटकेबाजी करत दक्षिण आफ्रिकेचा धावाफलक हलता ठेवला. मुथूसामी ८७ वर त यान्सन ४८ धावांवर खेळत असून, दक्षिण आफ्रिकेने ४०० धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.
रवींद्र जडेजाने काइल व्हेरिनला बाद केली. त्याने मुथुसामीच्या साथीने सातव्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी करत मजबूत भागीदारी रचली. व्हेरिन ४५ धावांवर बाद झाला, त्याचे अर्धशतक हुकले.
काइल व्हेरेन अर्धशतकाच्या जवळ आहे. व्हेरेन आणि मुथुस्वामी यांनी आधीच ८० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आहे, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा धावसंख्या ३३० पर्यंत पोहोचली आहे. दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांना अद्याप यश मिळालेले नाही.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याच्या दुसऱ्या दिवशी खेळाचे दुसरे सत्र सुरू झाले आहे. दक्षिण आफ्रिकेकडून मुथुस्वामी आणि व्हेरेन क्रीजवर आहेत. भारतीय गोलंदाज ही भागीदारी तोडण्याचा प्रयत्न करत आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा दुसरा सामना दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. आजच्या दिवसाचे पहिले सत्र दक्षिण आफ्रिकेच्या नावावर राहिले. भारतीय गोलंदाजाना एकही विकेट मिळाली नाही. दक्षिण आफ्रिकेसाठी मुथुसामी आणि वेरेने यांनी सातव्या विकेटसाठी केलेल्या भागीदारीमुळे दक्षिण आफ्रिका टी ब्रेकपर्यंत ६ गडी गमावत 316 धावा केल्या आहेत. मुथुसामी 56 आणि व्हेरेन 38 धावांवर खेळत आहेत.
मुथुस्वामी आणि व्हेरेन यांनी दक्षिण आफ्रिकचा डाव सावलार आहे. दक्षिण आफ्रिकेने ३०० धावांचा टप्पा पूर्ण केला असून मुथुस्वामी ४७ धावांवर तर व्हेरेन ३२ धावांवर खेळत आहे.
मुथुस्वामी आणि व्हेरेन यांच्यात सातव्या विकेटसाठी भागीदारी होत आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात २८० धावांचा टप्पा ओलांडला आहे.
IND vs SA 2nd Test Day 2 : आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस आहे. हा सामना गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या पहिल्या डावात सहा बाद २४७ धावा केल्या.
दुखापती कर्णधार शुभमन गिल दुसर्या कसोटीला मुकला आहे. भारत हा सामना ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. दरम्यान,भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आलं नाही. एखाद्या संघाच्या पहिल्या चार फलंदाजांनी एका डावात ३५ किंवा त्याहून अधिक धावा केल्याची ही कसोटी क्रिकेटमधील पहिलीच वेळ ठरली. कोणीही ५० धावांचा टप्पा ओलांडला नाही. प्रथम फलंदाजी करताना, एडेन मार्कराम आणि रायन रिकेलटन यांनी पहिल्या विकेटसाठी ८२ धावा जोडून संघाला चांगली सुरुवात दिली. या मालिकेतील ही सर्वोच्च सलामी भागीदारी ठरली. जसप्रीत बुमराहने मार्करामला ३८ धावांवर बाद केले. बुमराहने पहिल्या सत्राच्या समाप्तीपूर्वी मार्करामला बाद केले.
दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या पहिल्या डावात सहा बाद २४७ धावा केल्या. खेळ थांबला तेव्हा सेनुरन मुथुस्वामी २५ धावांसह आणि काइल व्हेरेन एका धावासह खेळत होते.