IND vs NZ 1st Test
न्यूझीलंडचा दुसरा डाव सुरू झाला;पण खराब प्रकाशामुळे सामना थांबवण्यात आला. यानंतर पावसाने हजेरी लावल्‍याने मैदानावरही कव्हर घालण्‍यात आले.

भारताचा दुसरा डाव ४६२ धावांवर संपुष्‍टात, न्‍यूझीलंडसमोर १०७ धावांचे लक्ष्‍य

IND vs NZ 1st Test : चौथ्या दिवसाचा खेळ संपला
Published on

न्‍यूझीलंडसमोर १०७ धावांचे लक्ष्‍य

चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारताने दुसऱ्या डावात 10 विकेट गमावत 402 धावा केल्या आणि न्यूझीलंडसमोर 107 धावांचे लक्ष्य ठेवले. टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉनवे क्रीजवर आहेत. यापूर्वी खराब प्रकाशामुळे सामना थांबवण्‍यात आला. मात्र यानंतर मुसळधार पावसामुळे आजच्‍या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.

भारताचा दुसरा डाव ४६२ धावांवर संपुष्‍टात

मॅट हेन्रीने भारताला सुराजला साउदी करवी झेलबाद करत भारताचा दुसरा डाव ४६२ धावांवर संपुष्‍टात आणला. भारताला दुसर्‍या डावात १०६ धावांची आघाडी मिळाली आहे. आता मालिकेतील पहिली कसोटी जिंकण्‍यासाठी न्‍यूझीलंडसमोर केवळ १०७ धावांचे लक्ष्‍य आहे. दुसर्‍या डावात सर्फराज 150 आणि ऋषभ पंत 99 धावांची खेळी लक्षवेधी ठरली. ३ बाद २३१ धावांवरुन भारताने खेळास प्रारंभ केला. सर्फराज आणि पंत यांनी चौथ्‍या विकेटसाठी 177 धावांची भागीदारी केली. सर्फराज 150 धावा करून बाद झाला आणि पंत 99 धावा करून बाद झाला. पहिल्या सत्रात भारताने एकही विकेट गमावली नव्‍हती. मात्र, दुसऱ्या सत्रात चेंडू बदलताच भारताचा डाव विस्कळीत झाला. सर्फराज आणि पंत बाद झाल्‍यानंतर. केएलने १२, जडेजाने पाच, अश्विन १५, कुलदीपने सहा* धावा केल्या तर बुमराह आणि सिराज खातेही उघडता आले नाही. न्‍यूझीलंडच्‍या हेन्री आणि रुर्के यांनी प्रत्येकी तीन तर इजाझने दोन विकेट तर साऊदी आणि ग्लेन फिलिप्सने प्रत्येकी एक विकेट घेतली. ( IND vs NZ 1st Test)

खराब प्रकाशामुळे सामना थांबला

न्यूझीलंडचा दुसरा डाव सुरू झाला;पण खराब प्रकाशामुळे सामना थांबवण्यात आला. मैदानावरही कव्हर घालण्‍यात आले. भारताने न्यूझीलंडसमोर 107 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आहे. टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉनवे क्रीजवर आहेत. आता रविवारी सामन्‍यासह बंगळूरुमधील हवामानाकडेही क्रिकेटप्रेमींचे लक्ष असणार आहे.

भारताला नववा धक्का, बुमराह आऊट

मॅट हेन्रीने भारताला नववा धक्‍का दिला. त्‍याने यष्‍टीरक्षक ब्‍लंडलकरवी बुमराहला शून्‍यावर बाद केले.

भारताला आ‍ठवा धक्का, अश्विन आऊट

मॅट हेन्रीने भारताला आ‍ठवा धक्का दिला. त्याने १५ धावांवर खे‍ळणार्‍या आर. अश्‍विनला पायचीत केले. भारताने दुसर्‍या डावात ४५८ धावांवर आठवी विकेट गमावली आहे.

भारताला १०० धावांची आघाडी

भारताची आघाडी 100 धावांपर्यंत वाढली असून स्कोअर 457/7 आहे. अश्विन आणि कुलदीप क्रीजवर आहेत.

रवींद्र जडेजाही बाद

चहापानानंतर रवींद्र जडेजाच्या रूपाने भारताला सातवा धक्का बसला. त्याला रुर्केने विल यंगच्या हाती झेलबाद केले. त्याला केवळ पाच धावा करता आल्या. कुलदीप यादव नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. अश्विन त्याला साथ देण्यासाठी क्रीजवर उपस्थित आहे. भारताची धावसंख्या ४४१/७ असून आघाडी ८५ धावांची आहे.

पंत पाठोपाठ केएल राहुलही आउट 

वेगवान गोलंदाज विलियम ओरूर्के याने यष्टीरक्षक ब्लंडेल याच्याकरवी केएल राहुल याला झेलबाद केले. राहुल के‍वळ १६ चेंडूत १२ धावा काढून माघारी परतला.

पंतचे शतक १ धावाने हुकले

विलियम ओरूर्केच्या चेंडूवर ऋषभ पंत क्लीन बोल्ड झाला. यामुळे पंतचे शतक १ धावाने हुकले. पंतने १०५ चेंडूत ९९ धावा केल्या. पंत आउट झाला तेव्हा भारताची ७७ धावांची आघाडी घेतली होती.

सर्फराज १५० धावांवर बाद

भारताचा युवा फलंदाज सर्फराज खान १५० धावा करून बाद झाला. टीम साऊदीने त्याला झेलबाद केले. सर्फराज आणि पंत यांच्यात चौथ्या विकेटसाठी १७७ धावांची भागीदारी झाली. केएल राहुल सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला आहे.

भारताने ४०० धावांचा टप्पा ओलांडला

सर्फराज खान आणि ऋषभ पंत यांच्या शानदार भागीदारीच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने पहिल्या डावात भारताला 46 धावांत सर्वबाद केल्यानंतर 402 धावा केल्या होत्या आणि 356 धावांची आघाडी घेतली होती.

पावसामुळे खेळाची वेळ वाढवली

पावसामुळे खेळाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरे सत्र दुपारी १.५० वाजता सुरू झाले. ते दुपारी ३.३० पर्यंत चालेल. तर, तिसरे सत्र दुपारी ३ .५० वाजल्यापासून सुरू होईल आणि ५.१५ पर्यंत चालेल.

सामना पुन्हा सुरू झाला

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाला आहे. भारतासाठी सर्फराज खान आणि ऋषभ पंत क्रीझवर उपस्थित आहेत, त्यांनी आतापर्यंत चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे.

पावसामुळे सामन्यात व्यत्यय

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे थांबवण्यात आला आहे. सरफराज खान आणि ऋषभ पंत यांच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर भारताने शनिवारी आपली स्थिती मजबूत केली. सरफराजने कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले, तर ऋषभ पंतनेही अर्धशतक झळकावले. खेळ थांबला तेव्हापर्यंत भारताने ३ गडी बाद ३४४ धावा केल्या होत्या, सध्या न्यूझीलंडपासून १२ धावांनी पिछाडीवर आहे. सर्फराज खान १२५ आणि पंतने ५३ धावा केल्या आहेत.

पंत-सरफराज यांच्यात शानदार भागीदारी

चौथ्या विकेटसाठी रफाझ खान आणि ऋषभ पंत यांच्यातील उत्कृष्ट भागीदारी कायम आहे. या दोन्ही फलंदाजांमध्ये आतापर्यंत ८८ धावांची भागीदारी झाली असून याच्या मदतीने भारताने दुसऱ्या डावात ३२५ धावांचा टप्पा ओलांडला आहे.

सर्फराज खानने शतक झळकावले

भारतीय फलंदाज सर्फराज खानने शानदार फलंदाजी करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. सरफराजने चौथ्या दिवशी ७० धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि आक्रमक शैलीत फलंदाजी केली. सर्फराजच्या शतकाच्या जोरावर भारताने तीन गड्यांच्या मोबदल्यात २७४ धावा केल्या असून सध्या ८२ धावांनी पिछाडीवर आहे.

चौथ्या दिवसाचा खेळ सुरू

बंगळुराच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. सर्फराज खानसोबत यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत क्रीझवर आला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विकेट कीपिंग करताना पंतला दुखापत झाली होती, मात्र तो आज फलंदाजीला आला. भारताने दुसऱ्या डावाची सुरुवात तीन विकेट्स २३१ धावांवर केली आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने पहिल्या डावातील अपयश विसरून आपल्या दुसऱ्या डावात दमदार बाऊन्स बॅक केले. गुरुवारी भारताचा पहिला डाव अवघ्या ४६ धावांत गारद झाला होता. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने रचिन रवींद्रच्या शतकाच्या (१३४) बळावर ४०२ धावा केल्या. यानंतर, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने आपल्या दुसऱ्या डावात ३ बाद २३१ धावा केल्या. भारतीय संघ १२५ धावांनी पिछाडीवर होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news