पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत- बांगला देश यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा आज रविवारी(दि.२९ सप्टेंबर) तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द झाला. कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवसातील खेळ शुक्रवारी दोन तासातच संपला होता. शुक्रवारी खेळ थांबला तेव्हा बांगला देशची अवस्था ३ बाद १०७ धावा अशी होती. आज रविवारीही तिसर्या दिवशीचा (IND vs BAN 2nd Test Day 3) खेळ एक चेंडूही न टाकता गेला वाया.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू आहे. पहिल्या दिवसाचा 35 षटकांचा खेळ संपल्यानंतर मुसळधार पावासाने हजरेी लावली. रविवारी तिसऱ्या दिवशी पाऊस पडला नाही, मात्र मैदान ओले झाल्यानंतर आजचा खेळही एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. भारतीय संघ सध्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.