पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटीच्या पहिला दिवस दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी गाजवला. नाणेफेक जिंकत फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाचा डाव १५० धावांवरच संपुष्टात आला. मात्र यानंतर गोर्लदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या कर्णधार जसप्रीत बुमराहच्या भेदक मार्यासमोर ऑस्ट्रेलियाचा डावही कोसळला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 7 गडी गमावून 67 धावा केल्या असून,अजूनही 83 धावांनी पिछाडीवर आहे. बुमराहने चार विकेट घेतल्या. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला 20 च्यापेक्षा अधिक धावा करता आलेल्या नााहीत.
टीम इंडिया 50 षटकेही फलंदाजीसाठी मैदानावर टिकू शकली नाही. संपूर्ण संघ 49.3 षटकांत गडगडला. नितीश रेड्डी यांनी सर्वाधिक 41 धावा केल्या. याशिवाय ऋषभ पंतने 37 धावांची तर केएल राहुलने 26 धावांची खेळी खेळली. भारताची सुरुवात खराब झाली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेले यशस्वी जैस्वाल आणि देवदत्त पडिक्कल खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. विराट कोहली पाच धावा करून बाद झाला तर ध्रुव जुरेल 11 धावा करून बाद झाला. वॉशिंग्टन सुंदरलाही चार धावा करता आल्या. पंत आणि नितीश यांनी सातव्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. कमिन्सने ही भागीदारी तोडली. पंत बाद होताच भारताचा डाव 150 धावांवर आटोपला. हर्षित राणा सात धावा करून बाद झाला तर बुमराह आठ धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने 4 विकेट घेतल्या. तर मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि मार्श यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. तिसऱ्याच षटकात बुमराहने नॅथन मॅकस्विनीला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला 10 धावा करता आल्या. यानंतर बुमराहने उस्मान ख्वाजाला कोहलीकरवी झेलबाद केले, त्यानंतर पुढच्याच चेंडूवर स्टीव्ह स्मिथला एलबीडब्ल्यू आऊट केले. ख्वाजाने आठ धावा केल्या तर स्मिथला खातेही उघडता आले नाही. पदार्पण वेगवान गोलंदाज हर्षित राणाला ट्रॅव्हिस हेड क्लीन बोल्ड केले. त्याला 11 धावा करता आल्या. त्याचवेळी मिचेल मार्श सहा धावा करून मोहम्मद सिराजचा बळी ठरला. त्यानंतर सिराजने लॅबुशेनला एलबीडब्ल्यू केले. त्याला 52 चेंडूत दोन धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला भारतीय कर्णधार बुमराहने पंतकरवी झेलबाद केले. त्याला तीन धावा करता आल्या. सध्या ॲलेक्स कॅरी १९ धावांवर नाबाद आहे तर मिचेल स्टार्क ४० धावांवर नाबाद आहे. बुमराहने चार, मोहम्मद सिराजने दोन, तर हर्षित राणाला एक विकेट मिळाली.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवुड.
भारत प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज.