भारताचा स्कोअर कार्ड फॅन्सी फोन नंबरसारखा!

 अ‍ॅडलेड : पुढारी ऑनलाईन

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाची दाणादाण उडाली. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवताना टीम इंडियाला एकामागून एक धक्के दिले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ४६ वर्षांपूर्वी भारतीय संघाने एक लाजीरवाणा विक्रम नोंदवला होता आणि तोही आज मोडला गेला. इतकेच नव्हे तर झालेल्या या डावात भारतीय संघातील एकालाही दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. त्यामुळे भारताचा स्कोअर कार्ड एखाद्या फॅन्सी फोन नंबर सारखा दिसू लागला. 

भारताच्या या खराब फलंदाजीमुळे ४६ वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा विक्रमही आज तुटला आहे. १९७४ मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरोधात झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं ४२ धावांची निच्चांकी धावसंख्या उभारली होती. आता ४६ वर्षांनंतर भारताने हा लाजीरवाणा विक्रम मोडला आहे. दुसऱ्या डावात भारतीय संघ फक्त ३६ धावांपर्यंत मजल मारु शकला. भारतीय संघाची ही निच्चांकी धावसंख्या ठरली आहे. 

झालेल्या या डावात डावात भारतीय संघातील एकालाही दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. भारताकडून पृथ्वी शॉ (४), मयांक (९), बुमराह (२), पुजारा (०). कोहली (४), रहाणे (०), विहारी (८), साहा (४), अश्विन (०), उमेश यादव (४ नाबाद) आणि शमी (१) अशी खेळी झाली. भारताच्या कसोटी इतिहासात असे पहिल्यांदाच झाले असून विराटसेनेची ही लाजिरवाणी कामगिरी ठरली. त्यामुळे भारताचा स्कोअर कार्ड एखाद्या फॅन्सी फोन नंबर सारखा दिसूू लागला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news