

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आगामी महिला एकदिवसीय वर्ल्ड कपसाठी सर्व महिला अधिकार्यांची निवड जाहीर केली आहे. हा निर्णय केवळ प्रतीकात्मक नसून, लैंगिक समानतेच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे ‘आयसीसी’ने म्हटले आहे.
भारत आणि श्रीलंकेत होणार्या या स्पर्धेला 30 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना गुवाहाटी येथे यजमान भारत आणि श्रीलंका यांच्यात होईल. एकूण आठ संघ पाच मैदानांवर स्पर्धा करतील आणि अंतिम सामना 2 नोव्हेंबर रोजी होईल. या पॅनेलमध्ये भारताच्या माजी खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय पंचांचा समावेश आहे. यामध्ये वृंदा राठी, एन. जननी आणि गायत्री वेणुगोपालन यांचा पंच म्हणून समावेश आहे. तसेच, भारताची माजी क्रिकेटपटू आणि पहिली महिला सामनाधिकारी (मॅच रेफ्री) जी. एस. लक्ष्मी चार सदस्यीय सामनाधिकारी पॅनेलचा भाग असतील.
क्लेअर पोलोसक, जॅकलिन विल्यम्स आणि सू रेडफर्न या तिसर्यांदा महिलांच्या वर्ल्ड कपमध्ये पंच म्हणून काम करणार आहेत. तसेच, लॉरेन एगेनबॅग आणि किम कॉटन दुसर्यांदा या स्पर्धेत पंचगिरी करतील.
सामनाधिकारी (मॅच रेफ्रीज): ट्रुडी अँडरसन, शँड्रे फ्रिट्झ, जी. एस. लक्ष्मी, मिशेल परेरा.
पंच (अंपायर): लॉरेन एगेनबॅग, कँडिस ला बोर्डे, किम कॉटन, सारा डंबनेवना, शथीरा जकीर जेसी, केरिन क्लास्ट, जननी एन., निमाली परेरा, क्लेअर पोलोसक, वृंदा राठी, सू रेडफर्न, एलोईस शेरीडन, गायत्री वेणुगोपालन, जॅकलिन विल्यम्स.