Navdeep Singh : "मला जीवन संपवण्याच्या सल्ला दिला होता"...
पुढारी ऑनलाईन डेस्क : काही लोक म्हणत होते कि, तु आयुष्यात काही करु शकणार नाहीस. असलं जीवन जगण्यापेक्षा तू तुझे जीवनच संपव. सर्वांना वाटत होत की, मी माझ्या आयुष्यात काही करु शकणार नाही; पण मी खचलो नाही, हार मानली नाही, माझ्यातील उत्साह कायम ठेवला, अशा शब्दामध्ये पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेता नवदीप सिंह याने टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. रिओ पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नवदीप सिंहने भारतात परतल्यानंतर आपल्या संघर्षाची कहाणी सांगितली आहे.
नवदीपने केले वडिलांचे स्मरण
यादरम्यान, नवदीपला त्याच्या वडिलांचीही आठवण झाली. पॅरा ॲथलीटने सांगितले की, त्याच्या वडिलांनी त्याच्या खेळाडू म्हणून सुरु केलेल्या सुरुवातीच्या प्रवासात खुप मदत केली. यावेळी पॅरा ॲथलीटने आपल्यासारख्या असणाऱ्या अनेक खेळाडूंना सामान्य खेळाडूंप्रमाणेच आदर देण्याची विनंती केली.
नवदीपच्या रौप्य पदकाचे सुवर्ण पदकामध्ये रूपांतर
F41 श्रेणीच्या अंतिम फेरीत नवदीपच्या थ्रोनंतर नवदीप 47.32 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह दुसऱ्या स्थानावर होता, परंतु इराणच्या बीत सयाह सदेघ अपात्र ठरल्यानंतर त्याच्या रौप्य पदकाचे सुवर्णात रूपांतर झाले. वारंवार आक्षेपार्ह ध्वज प्रदर्शित केल्याबद्दल सयाह याला अपात्र ठरवण्यात आले. त्याच्या या कृत्यामुळे त्याला सुवर्णपदक गमवावे लागले. तसेच नवदीपची सुवर्ण पदकासाठी पात्र ठरला.


