गुजरातने रोखला आरसीबीचा ‘विजयरथ’

RCB vs GT: आयपीएल साखळी सामन्यात आरसीबीला 8 गडी राखून नमवले
RCB vs GT
गुजरातने रोखला आरसीबीचा ‘विजयरथ’
Published on
Updated on

बंगळूर : जोस बटलर-साई सुदर्शनची धमाकेदार फलंदाजी आणि गोलंदाजांच्या चतुरस्र मार्‍याच्या बळावर गुजरात टायटन्सने आयपीएल साखळी सामन्यात आरसीबीचा तब्बल 8 गडी राखून धुव्वा उडवला. या विजयासह त्यांनी आरसीबीचा विजयरथही रोखण्याचा पराक्रम गाजवला. प्रारंभी आरसीबीला निर्धारित 20 षटकांत 8 बाद 169 धावांवर रोखल्यानंतर गुजरातने 17.5 षटकांत 2 बाद 170 धावांसह दणकेबाज विजय साकारला. विजयासाठी 170 धावांचे आव्हान असताना जोस बटलरने 39 चेंडूंत 5 चौकार, 6 षटकारांसह नाबाद 73 धावांची आतषबाजी केली तर सलामीवीर साई सुदर्शनने 36 चेंडूंत 49 धावा चोपल्या. कर्णधार शुभमन (14) स्वस्तात बाद झाला असला तरी बटलरने शेरफेन रुदरफोर्डसह विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. रुदरफोर्ड 18 चेंडूंत 30 धावांवर नाबाद राहिला.

प्रारंभी, गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि आरसीबीला निर्धारित 20 षटकांत 8 बाद 169 धावांवर रोखले. पाचव्या स्थानावरील लियाम लिव्हिंगस्टोनने 40 चेंडूंत सर्वाधिक 54 धावांचे योगदान दिले तर जितेश शर्माने 21 चेंडूंत 33 धावा फटकावल्या. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 42 धावांची भागीदारी केली. ठरावीक अंतराने गडी बाद होत राहिल्याने याचा आरसीबीला सातत्याने फटका बसत राहिला आणि यामुळे त्यांच्या धावसंख्येवरही मर्यादा येत राहिल्या. फिल सॉल्ट (14) व विराट क ोहली (7) हे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाल्यानंतर तोच कित्ता थोड्याफार फरकाने देवदत्त पडिक्कल (4) व कर्णधार रजत पाटीदार (12) यांनीही गिरवला. या पडझडीमुळे आरसीबीची पाहता पाहता 6.2 षटकात 4 बाद 42 अशी दैना उडाली. सॉल्टचा सिराजने त्रिफळा उडवला तर विराटने अर्शदच्या गोलंदाजीवर लाँग लेगवरील प्रसिद्ध कृष्णाकडे सोपा झेल दिला. देवदत्त पडिक्कललाही सिराजनेच त्रिफ ळा उडवत तंबूचा रस्ता दाखवला. इशांतने रजतला पायचीत करत आरसीबीच्या अडचणीत आणखी भर घातली.

लिव्हिंगस्टोनने एक बाजू लावून धरताना 40 चेंडूत 54 धावा केल्या, त्यावेळी त्यात 1 चौकार व 5 षटकारांचा समावेश राहिला. आठव्या स्थानी फलंदाजीला उतरलेल्या टीम डेव्हिडने 18 चेंडूंत जलद 32 धावा फटक ावल्या आणि याचमुळे आरसीबीला 170 धावांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचता आले होते. गुजराततर्फे मोहम्मद सिराजने 4 षटकांत 19 धावांत 3 तर साई किशोरने 4 षटकांत 22 धावांत 2 बळी घेतले. याशिवाय, अर्शद खान, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक

आरसीबी : 20 षटकांत 8 बाद 169. (लिव्हिंगस्टोन 40 चेंडूंत 54, जितेश शर्मा 33, टीम डेव्हिड 32. सिराज 3-19, साई किशोर 2-22).

गुजरात टायटन्स : 17.5 षटकांत 2 बाद 170. (जोस बटलर 39 चेंडूंत नाबाद 73, साई सुदर्शन 36 चेंडूंत 49, रुदरफोर्ड नाबाद 30.भुवनेश्वर, हेझलवूड प्रत्येकी 1 बळी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news