PR Sreejesh : निवृत्तीनंतर गोलकिपर पीआर श्रीजेशकडे मोठी जबाबदारी

हॉकी इंडियाने केली घोषणा
PR Sreejesh
भारतीय हॉकी संघाचा गोलकिपर पीआर श्रीजेश याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर निवृत्ती जाहीर केली.X (Twitter)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय हॉकी संघाची 'भिंत' अशी ओळख असलेल्‍या हॉकी संघाचा गोलकिपर पीआर श्रीजेश याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर गुरुवारी निवृत्ती घेतली. आता त्‍याच्‍यावर नवी जबाबदारी सोपविण्‍याचा निर्णय हॉक इंडियाने घेतला आहे. हॉकी इंडियाने पीआर श्रीजेश याची ज्युनियर पुरुष हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. तो आता युवा संघाला घडविणार आहे.

भारताने स्पेनला हरवून कांस्यपदक जिंकले

भारताने गुरुवारी स्पेनचा 2-1 असा पराभव करत कांस्यपदक जिंकले. या सामन्‍यानंतर श्रीजेशने हॉकीला अलविदा केला. श्रीजेश दीर्घ काळापासून भारतीय हॉकी संघाचा महत्त्वाचा सदस्य राहिला होता. श्रीजेशने पॅरिस ऑलिम्पिकमध्येही चमकदार कामगिरी केली. प्रतिस्पर्धी संघासमोर भिंतीसारखा उभा राहिला. स्पेनविरुद्धच्या कांस्यपदकाच्या लढतीतही श्रीजेशने अखेरच्या क्वार्टरमध्ये शानदार सेव्ह करत त्यांना आघाडी घेण्यापासून रोखले. अशा प्रकारे संघाने श्रीजेशच्‍या हॉकी कारकीर्दीला विजयासह निरोप दिला.

निवृत्तीच्या निर्णयावर श्रीजेश काय म्हणाला?

शुक्रवारी श्रीजेशच्या निवृत्तीनंतर चाहते त्याच्या पुनरागमनाची मागणी करत होते. याविषयी तो म्हणाला, " आता निरोपाचीहीच योग्य वेळ आहे. ऑलिम्पिक खेळांना पदक देऊन निरोप देण्याचा हा योग्य मार्ग आहे, असे मला वाटते. आम्ही रिकाम्या हाताने घरी जात नाही, ही मोठी गोष्ट आहे. मला लोकांच्या भावना समजतात. मी त्यांचा आदर करतो; पण योग्य वेळी निर्णय घेतल्याने माझा निर्णय बदलणार नाही आणि त्यामुळे हा सामना अविस्मरणीय बनला. आमच्या हृदयात त्याचे विशेष स्थान आहे. यामुळे आम्हाला आत्मविश्वास मिळाला की आम्ही ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकू शकतो."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news