नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या महिन्यात मॅक्सवेलने आपली भारतीय गर्लफ—ेंड विनी रामनसोबत साखरपुडा केला. सोशल मीडियावर या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. आयपीएलसाठी किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी खेळणार्या मॅक्सवेल आणि विनी एकमेकांना बर्याच काळापासून डेट करीत आहेत. आता दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
मॅक्सवेल व विनीने वैदिक पद्धतीने आपला साखरपुडा केला. या फोटोमध्ये विनीने हिरव्या लेहेंग्यासोबत बांगड्या आणि गोल्ड नेकलेस घातला आहे. दुसरीकडे मॅक्सवेलदेखील हिरव्या रंगाच्या शेरवानीत दिसला. विनीने या कार्यक्रमाचा फोटो सोशल मीडिया अकाऊंड इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या दरम्यान दोघेही खेळाडू एक-दुसर्यासोबत आहेत. आम्ही भारतीय पद्धतीने साखरपुडा केला आणि मॅक्सवेलने आपल्या लग्नाची झलक देखील दिली, असे फोटोला विनीने कॅप्शन दिले आहे.