राफेल नदालची फ्रेंच ओपन जिंकत फेडररच्या विश्वविक्रमाशी बरोबरी 

Published on
Updated on

पॅरिस : पुढारी ऑनलाईन 

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राफेल नदालने अव्वल स्थानावर असलेल्या नोव्हाक जोकोविचा पराभव करत विक्रमी १३ वे फ्रेंच ओपन जिंकले. याचबरोबर त्याने रॉजर फेडररचे स्रवाधिक २० ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. याचबरोबर स्पेनच्या या टेनिसपटूने फ्रेंच ओपनमध्ये १०० सामने जिंकण्याचाही विश्वविक्रम केला. 

फ्रेंच ओपनचा बादशाह असलेल्या राफेल नदालने आजच्या सामन्यातही आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. त्याने जोकोविच विरुद्धचा पहिला सेट ६ – ० ने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही जोकोविचला प्रतिकाराची साधी संधीही न देता त्याने हा सेट ६ – २ असा आपल्या नावावर केला. या दोन गेम वाईट पद्धतीने हारल्यानंतर जोकोविच तिसऱ्या सेटमध्ये भानावर आला आणि त्याने नदालला प्रतिकार केला. पण, क्ले कोर्टचा बादशाह नदालने त्याचे हे आव्हान ७ – ५ असे मोडून काढत आपल्या १३ व्या फ्रेंच ओपनचे चुंबन घेतले.  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news