केन विल्यमसन भारताविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीला मुकणार

Kane Williamson | India vs New Zealand | केन विल्यमसन मांडीच्या दुखापतीने त्रस्त
Kane Williamson  injury
केन विल्यमसन मांडीच्या दुखापतीने त्रस्त असल्याने भारताविरोधातील तिसरी कसोटी खेळणार नाही.Pudhari Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज केन विल्यमसन (Kane Williamson) मांडीच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळे केन भारताविरुद्ध १ नोव्हेंबरपासून मुंबईत सुरू होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटीला मुकणार आहे. याबाबतची माहिती न्यूझीलंड क्रिकेट (NZC) ने दिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या आगामी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी विल्यमसनचा फिटनेस महत्वाचा आहे. त्यामुळे केन भारताविरूद्ध तिसरी कसोटी (India vs New Zealand) खेळणार नाही, असे न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी सांगितले.

Summary 

  • विल्यमसन दुखापतीमुळे पहिल्या दोन कसोटीत खेळू शकला नाही

  • आता केन भारताविरुद्धची तिसरी कसोटीही खेळणार नाही

  • १ नोव्हेंबरपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना सुरू होणार आहे.

गॅरी स्टीड यांनी सांगितले की, 'केनच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे, परंतु यावेळी तो भारतासोबत (India vs New Zealand) खेळण्यास पूर्णपणे तयार नाही. तो इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज होण्यासाठी तयारी करत आहे.

केन विल्यमसनची कसोटी कारकीर्द

34 वर्षीय केन विल्यमसनने 2010 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने 14 वर्षात 102 कसोटी सामने खेळले आहेत. 54.5 च्या उत्कृष्ट सरासरीने फलंदाजी करताना 8881 धावा केल्या आहेत. कसोटीत त्यांने 32 शतके आणि 35 अर्धशतके झळकावली आहेत.

28 नोव्हेंबरपासून इंग्लंडमध्ये कसोटी मालिका सुरू

इंग्लंडविरुद्धच्या 3 कसोटी सामन्यांची मालिका 28 नोव्हेंबरपासून क्राइस्टचर्चमध्ये सुरू होणार आहे. श्रीलंका दौऱ्यात विल्यमसनला दुखापत झाली होती. त्यामुळे विल्यमसन भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांना खेळू शकला नव्हता. मात्र, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेली कसोटी मालिका न्यूझीलंडने आधीच जिंकली आहे. न्यूझीलंड सध्या 2-0 ने आघाडीवर आहे आणि न्यूझीलंडचा हा भारतातील पहिला कसोटी मालिका विजय आहे. त्याचबरोबर भारताने 12 वर्षात प्रथमच घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावली आहे. याआधी १२ वर्षांपूर्वी भारतीय भूमीवर भारताचा इंग्लंडकडून २-१ असा पराभव झाला होता.

भारत-ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी १७ डिसेंबरपासून | पुढारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news