FIFA World Cup 2026 : आता 'करो या मरो'..! जाणून घ्‍या फिफा विश्‍वचषकातील राऊंड ऑफ-32मधील सामने कधी आणि कुठे?

फुटबॉल चाहत्‍यांना मोठे उलटफेर आणि हाय-व्होल्टेज सामने पाहायला मिळणार
FIFA World Cup 2026
FIFA World Cup 2026 Pudhari
Published on
Updated on

FIFA World Cup 2026 Round of 32 Schedule: फिफा विश्वचषक २०२६ आता रंजक टप्‍प्‍यावर आले आहे.आता हा प्रवास 'राऊंड ऑफ ३२' पर्यंत पोहोचला आहे. येथून नॉकआउट फेरीची सुरुवात होईल. म्हणजेच आता प्रत्येक सामना 'करो या मरो' (Do or Die) असा असेल. हरणाऱ्या संघाचा प्रवास तिथेच संपणार आहे. आतापर्यंत ३२ पैकी ३० संघांनी 'राऊंड ऑफ ३२' मध्ये आपले स्थान पक्के केले आहे, तर दोन जागा अजूनही रिकाम्या आहेत. नॉकआउट टप्प्यात आता ब्राझील-जपान, नेदरलँड्स-मोरोक्को, पोर्तुगाल-क्रोएशिया आणि कोलंबिया-घाना यांच्यात रोमांचक सामने पाहायला मिळतील. दुसरीकडे, अनेक मोठे संघ ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडले आहेत. फुटबॉल चाहत्यांना पुढील काही दिवसांत अनेक मोठे उलटफेर आणि हाय-व्होल्टेज सामने पाहायला मिळणार आहेत.

यंदाचा फिफा विश्‍वचषक स्‍पर्धेत नवीन फॉरमॅट

यंदा फिफा विश्‍वचषक स्‍पर्धेत ४८ संघांची १२ ग्रुपमध्ये (A ते L) अशी विभागणी करण्यात आली होती. प्रत्येक ग्रुपमध्ये चार संघ होते. गट फेरीत प्रत्येक संघ तीन सामने खेळला. ग्रुप स्टेज (गट फेरी) संपल्यानंतर एकूण ३२ संघ पुढील फेरीत पोहोचले. या ३२ संघांची निवड खालीलप्रमाणे झाली आहे.

  • १२ ग्रुप विजेते

  • १२ ग्रुप उपविजेते

  • तिसऱ्या स्थानावर राहिलेले ८ सर्वोत्तम संघ

तिसऱ्या स्थानावर राहिलेले सर्व १२ संघ पुढे गेलेले नाहीत. यापैकी केवळ आठ संघांनाच संधी मिळाली आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या चार संघांचा प्रवास इथेच संपला आहे.

FIFA World Cup 2026
FIFA World Cup : भांडी घासणारा.. पोस्टमन अन् नवख्यांची टोळी; 'या' 6 सामन्यांनी रडवलं होतं फुटबॉलच्या महासत्तांना!

राऊंड ऑफ ३२ मध्ये पोहोचलेले ३२ संघ

  • दक्षिण आफ्रिका, कॅनडा, ब्राझील, जपान, जर्मनी, पराग्वे, नेदरलँड्स, मोरोक्को

  • आयव्हरी कोस्ट, नॉर्वे, फ्रान्स, स्वीडन, मेक्सिको, इक्वेडोर, इंग्लंड, डीआर काँगो

  • बेल्जियम, सेनेगल, अमेरिका, बोस्निया आणि हर्जेगोविना, पोर्तुगाल, क्रोएशिया, ऑस्ट्रेलिया, इजिप्त

  • अर्जेंटिना, केप वर्दे, कोलंबिया, घाना, स्पेन, स्वित्झर्लंड, अल्जीरिया, ऑस्ट्रिया

FIFA World Cup 2026
FIFA World Cup Gilberto Mora: कोण आहे हा गिलबर्टो मोरा? १७ वर्षीय फुटबॉलपटूने फिफा विश्वचषकात ९६ वर्षांचा विक्रम मोडला!

अनेक सामने होणार हाय-व्होल्टेज

राऊंड ऑफ ३२ मधील अनेक सामने रोमांचक ठरणार आहेत. ब्राझीलचा सामना आशियाई चॅम्पियन जपानशी होईल, तर युरोपियन दिग्गज नेदरलँड्ससमोर मजबूत मोरोक्कोचे आव्हान असेल. सर्वात जास्त चर्चा असलेल्या सामन्यांमध्ये पोर्तुगाल आणि क्रोएशिया यांच्यातील लढतीचा समावेश आहे. क्रिस्टियानो रोनाल्डोच्या संघाला लुका मॉड्रिचच्या अनुभवी क्रोएशियन संघाचा सामना करावा लागेल. ग्रुप विजेता कोलंबियाचा सामना घानाशी होईल,र इंग्लंडची लढत पहिल्यांदाच नॉकआउटमध्ये पोहोचलेल्या डीआर काँगोशी होईल. अर्जेंटिनासमोर केप वर्देचे आव्हान असेल. कागदावर अर्जेंटिना मजबूत दिसत असली, तरी केप वर्देने ग्रुप स्टेजमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांना प्रभावित केले आहे.

FIFA World Cup 2026
FIFA World Cup 2026 : "फुटबॉल आमच्या चारित्र्याची.." : सामन्यानंतर 'फेअर प्ले' मेसेजमध्ये इराणने नेमकं काय म्हटलं?
Pudhari

कोणत्या संघांचा प्रवास पहिल्या फेरीतच संपला?

हैती, तुर्की, ट्युनिशिया, जॉर्डन, पनामा, कतार, चेकिया, कुरासाओ, न्यूझीलंड, उरुग्वे, सौदी अरेबिया, इराक, उझबेकिस्तान, दक्षिण कोरिया, स्कॉटलंड, इराण या संघाचे फिफा विश्‍वचषक स्‍पर्धेत आव्‍हान संपुष्‍टात आले आहे.

FIFA World Cup 2026
FIFA World Cup Black Magic: घानाने केली इंग्लंडच्या कर्णधारावर काळी जादू...? हॅरीने गोलची सोपी संधी दवडली अन् सामना बरोबरीत

नॉकआउटचा सामने आणि कालावधी

  • राऊंड ऑफ-३२: २८ जून ते ३ जुलै

  • राऊंड ऑफ-१६: ४ ते ७ जुलै

  • क्वार्टर फायनल: ९ ते ११ जुलै

  • सेमीफायनल: १४ और १५ जुलै

  • तिसऱ्या स्थानासाठी सामना: १८ जुलै

  • फायनल: १९ जुलै (न्यू जर्सी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news