12 वर्षांनंतर स्‍पॅनिश ब्रिगेड युरो कपच्या अंतिम फेरीत, फ्रान्‍सला नमवले

पिछाडी भरुन काढत स्‍पेनचा शानदार विजय
Spain vs France EURO Cup.JPG
युरो कप फुटबॉल स्‍पर्धेतील पहिल्‍या उपांत्‍य लढतीत स्पेनने फ्रान्‍सविरुद्ध शानदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. Twitter
Published on
Updated on

बर्लिन, वृत्तसंस्‍था : युरो कप फुटबॉल स्‍पर्धेतील पहिल्‍या उपांत्‍य लढतीत स्पेनने फ्रान्‍सविरुद्ध शानदार विजय मिळवत अंतिम फेरीत जोरदार धडक मारली. स्‍पेनने या स्‍पर्धेच्‍या अंतिम फेरीत धडक मारण्‍याची ही 12 वर्षांनंतरची पहिलीच वेळ आहे. मंगळवारी (दि. 9) जर्मनीच्या बर्लिनमधील अलियान्झ एरिना येथे अटीतटीने खेळवल्‍या गेलेल्‍या या पहिल्या उपांत्य फेरीत स्‍पेनने फ्रान्सचा 2-1 असा पराभव केला. दानी ओल्मो आणि 16 वर्षीय लॅमिने यामल यांनी स्‍पॅनिश ब्रिगेडतर्फे प्रत्‍येकी एक गोल केला. अंतिम फेरीत आता स्‍पॅनिश ब्रिगेडची लढत इंग्‍लंड-नेदरलँड यांच्‍यातील विजेत्‍याशी होईल.

फ्रान्सने आघाडी मिळवली पण...

यापूर्वी, स्पेनने 2012 मध्ये इटलीला नमवत अंतिम फेरीत धडक मारली होती. बुधवारी झालेल्‍या लढतीत सामन्याच्या पहिल्या 10 मिनिटांत एक गोल करून फ्रान्सने आघाडी घेतली होती, मात्र 15 मिनिटांनंतर स्पेनने पहिला गोल नोंदवून बरोबरी साधली.

एम्‍बापेचे आक्रमण थोपवले

या लढतीत 7व्या मिनिटाला फ्रान्सचा कर्णधार एम्‍बापेने गोल करण्याचा प्रयत्न केला. तो गोलपोस्टपर्यंत पोहोचण्याआधीच हे आक्रमण थोपवले गेले. मात्र, अवघ्या दोन मिनिटांनंतर कोलो मुआनीने हेडरवर गोलजाळ्याचा अचूक वेध घेत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

स्पेनचे 4 मिनिटांत 2 गोल

फ्रान्सने आघाडी घेतली खरी. पण, त्‍याचा आनंद फार काळ टिकला नाही. 21व्या मिनिटाला 16 वर्षीय लॅमिने यामलने गोल करत स्‍पेनला बरोबरी मिळवून दिली तर त्‍यानंतर अवघ्‍या 4 मिनिटांनी डॅनी ओल्मोने गोल करून संघाला 2-1 अशा आघाडीवर नेले. नंतर पूर्ण वेळ संपेतोवर हाच गोलफरक कायम राहिला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news