England vs India | शेवटच्‍या सामन्‍यातही भारताचा दारुण पराभव

भारतीय संघ ट्रॅफिकमध्‍ये अडकल्‍याने सामन्‍याला उशीर
England vs India |
England vs India | शेवटच्‍या सामन्‍यातही भारताचा दारुण पराभव
Published on
Updated on

साऊथम्पटन : इंग्लंडने पाचव्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचा ५६ धावांनी धुव्वा उडवला. या मानहानीकारक पराभवासह भारताला ४-० अशा फरकाने ऐतिहासिक ‘क्लीन स्विप'चा सामना करावा लागला. इंग्‍लंडने 3 बाद २५७ धावा रचल्‍या तर प्रत्‍युत्तरात भारताला ८ बाद २०१ धावांवर समाधान मानावे लागले. बटलर (६४ चेंडूंत १३१), ब्रूक (४५ चेंडूंत नाबाद ९५) यांनी दुसऱ्या गड्यासाठी तब्बल २३३ धावांची भागीदारी रचली. तत्‍पूर्वी, भारतीय संघ ट्रॅफिक जाममध्‍ये अडकल्‍याने या सामन्‍याला अर्ध्या तासाने उशिरा सुरुवात करण्‍यात आली.

२५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजीचा प्रयत्न केला. मात्र, नियमित अंतराने विकेट्स पडत गेल्याने भारताला २० षटकांत ८ बाद २०१ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून ईशान किशनने ५६, तिलक वर्माने ५३ धावा करत अर्धशतके झळकावली. याशिवाय श्रेयस अय्यरने २८, संजू सॅमसनने २७ आणि शिवम दुबेने १४ धावांचे योगदान दिले. मात्र, त्यांना अन्य फलंदाजांची साथ लाभली नाही. इंग्लंडकडून सॅम करनने सर्वाधिक ३ बळी घेतले. आदिल रशीदने २, तर जोफ्रा आर्चर, जोश टंग आणि लियाम डॉसन यांनी प्रत्येकी १ बळी मिळवत भारताच्या विजयाच्या आशा संपुष्टात आणल्या. या विजयासह इंग्लंडने मालिकेवर ४-० अशी निर्विवाद मोहोर उमटवली, तर भारतीय संघाला निराशाजनक कामगिरीमुळे क्लीन स्वीपचा सामना करावा लागला.

संक्षिप्‍त धावफलक:  इंग्लंड : ३/२५७ (बटलर ६४ चेंडूंत १३१, हॅरी ब्रुक ४५ चेंडूंत नाबाद ९५. दुबे २/२२). भारत : ८/२०१. (किशन ५६, तिलक वर्मा ५३. सॅम कुरेन ३/३६).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news