

India vs England 1st Test Day 2 Live Updates
लीडस् : भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा शनिवारी (दि.२१ जून) दुसरा दिवस आहे. भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलने सामन्याच्या पहिल्या दिवशी शतक झळकावले होते. पहिल्या दिवशी भारताने ३ बाद ३५९ धावा चोपल्या होत्या.
कसोटीच्या दुसऱ्या दिवशी खेळ संपत आला त्यावेळी ऑली पोप अजूनही क्रीजवर टिकून आहे. त्याने इंग्लंडचा डाव सांभाळला आहे. पोपला पाठिंबा देण्यासाठी दुसऱ्या बाजूने जो रूट खेळत आहे. इंग्लंडचा स्कोअर १६० धावांच्या पुढे गेला आहे. इंग्लंडचा संघ सध्या भारतापेक्षा अजून ३३० धावांनी पिछाडीवर आहे.
जसप्रीत बुमराहने बेन डकेटला बाद करत इंग्लंडला दुसरी विकेट मिळवून दिली. यासोबतच, डकेट आणि ऑली पोप यांच्यातील दुसऱ्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी संपुष्टात आली. ९४ चेंडूत नऊ चौकारांसह ६२ धावा काढल्यानंतर डकेट बाद झाला.
इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटने ६८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. डकेट आणि ऑली पोप यांच्यातील दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी देखील पूर्ण झाली आहे. पोप देखील अर्धशतक ठोकण्याच्या जवळ आहे. इंग्लंडची धावसंख्या सध्या एका विकेटच्या मोबदल्यात १०५ आहे. सध्या भारतापेक्षा ३६६ धावांनी पिछाडीवर आहे.
पहिल्याच षटकात झॅक क्रॉलीचा बळी घेतल्यानंतर भारतीय गोलंदाजाना विकेट मिळवता आलेली नाही. इंग्लंडचा स्कोअर ८० धावांच्या पुढे गेला आहे. बेन डकेट आणि ऑली पोप यांच्यातील अर्धशतकी भागीदारीही पूर्ण झाली आहे. बुमराहने भारताला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला पण डकेट आणि पोपने इंग्लंडचा डाव सांभाळला.
८ व्या षटकापर्यंत इंग्लडने धावफलक हलता ठेवला असून. क्रोल बाद झाल्यानंतर डकेट व पोप क्रिझवर टिकून आहेत. दरम्यान जसप्रीतच्या षटकात शेवटच्या चेंडूत डकेटचा उडालेले झेल रविंद्र जडेजाला पकडण्यात अपयश आले. इंग्लडचा स्कोर ४० च्या वर गेला आहे.
ब्रेक नंतर काही वेळ पावसाने मैदानावर हजेरी लावली. भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडेसात वाजता खेळ सुरु झाला यावेळी पहिल्याच षटकात जसप्रीत बुमराह याने इंग्लडला झटका दिला. क्रॉलीला पॅव्हेलियनमध्ये परतला; बुमराहने विकेट घेतली. यावेळी इंग्लडच्या केवळ ४ धावा झाल्या होत्या. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बुमराहने क्रॉलीला स्लिपमध्ये करुण नायरकडून झेलबाद केले. सहा चेंडूत चार धावा काढून क्रॉली बाद झाला.
इंग्लंडविरूद्धच्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताचा संघ 113 ओव्हरमध्ये 471 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून जोश टंग याने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. संघाच्या 458 धावा झाल्या असताना बुमराह आऊट झाला.
त्यानंतर टंग यानेच रविंद्र जडेजा आणि त्यानंतर प्रसिद्ध कृष्णा यांना बाद करत भारताची इनिंग संपुष्टात आणली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यानेही चार विकेट घेतल्या. ब्रायडन कार्स आणि शोएब बशीर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारताकडून सलामीवर यशस्वी जयस्वाल (101), कर्णधार शुभमन गिल (147) आणि ऋषभ पंत (134) यांनी शतके झळकावली. के. एल. राहुने 42 धावा केल्या. रविंद्र जडेजा (11), शार्दुल ठाकूर (1) हे स्वस्तात परतले. तर साई सुदर्शन, करूण नायर, जसप्रीत बुमराह हे तिघेजण शुन्यावर बाद झाले. मोहम्मद सिराज 3 धावांवर नाबाद राहिला. भारताच्या इनिंगमध्ये 31 धावा अवांतर (नोबॉल 9, वाईड 2, बाईज 1, लेग बाईज 14 ) आहेत.
इंग्लंड विरूद्ध भारत टेस्ट सिरीजमधील पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चहापानानंतर भारताला आठवा धक्का बसला. जोश टंग याने जसप्रित बुमराह याला आऊट केले. हॅरी ब्रुकने त्याचा झेल घेतला.
भारताला पाठोपाठ दोन धक्के बसले. जोश टंगने पंतला पायचीत केले. यामुळे पंत १३४ धावांची खेळी करत माघारी परतला. त्यानंतर स्टोक्सने शार्दुल ठाकूरला जेमी स्मिथ करवी झेलबाद केले. ठाकूर केवळ १ धाव करु शकला. यामुळे लंच ब्रेकपर्यंत भारताने ७ बाद ४५४ धावांपर्यंत मजल मारली.
गिल पाठोपाठ भारताला आणखी एक धक्का बसला. स्ट्रोक्सने करुण नायरला झेलबाद केले. नायर एकही धाव न करता माघारी परतला.
१०२ व्या षटकांत बशीरने शुभमन गिलला डीप मिड-विकेटवर जोश टंग करवी झेलबाद केले. गिलने २२७ चेंडू खेळत १४७ धावांची खेळी केली. सध्या पंत आणि करुण नायर मैदानात खेळत आहेत.
ऋषभ पंतने (Rishabh Pant) शोएब बशीरच्या चेंडूवर आणखी एक षटकार मारत शतक पूर्ण केले. त्याने १४७ चेंडूत ४ चौकार आणि १० षटकांरच्या मदतीने शतकी खेळी केली. त्याचे हे कसोटीतील सातवे शतक आहे. पंतने बशीरच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरही आणखी एक षटकार ठोकला.
९६ व्या षटकात बशीरच्या चेंडूवर पंतने डीप मिड-विकेटवर षटकार ठोकला. यामुळे पंत शतकाच्या जवळ पोहोचला आहे. तर गिल १४४ धावांवर खेळत आहे. यामुळे भारताने ३ बाद ४०० धावांवर मजल मारली आहे.
ऋषभ पंतची शतकाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. त्याने २ षटकार, ८ चौकार ठोकत ११९ चेंडूत ७७ धावा केल्या आहेत. तर गिलचे द्विशतकाकडे लक्ष आहे. त्याने २०० चेंडूत १३५ धावा कुटल्या आहेत. यात १ षटकार आणि १७ चौकारांचा समावेश आहे.