ENG vs WI | कॅरेबियन वादळाचा इंग्लंडला तडाखा

वेस्ट इंडिजचा 30 धावांनी दणदणीत विजय
ENG vs WI | कॅरेबियन वादळाचा इंग्लंडला तडाखा
ENG vs WI | कॅरेबियन वादळाचा इंग्लंडला तडाखा
Published on
Updated on

मुंबई; वृत्तसंस्था : शेरफेन रुदरफोर्डची नाबाद 76 धावांची वादळी खेळी आणि फिरकीपटू गुडाकेश मोटीचा (3/32) भेदक मारा यांच्या जोरावर वेस्ट इंडिजने टी-20 विश्वचषकाच्या गट ‘क’मधील अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडला 30 धावांनी धूळ चारली. बुधवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात विंडीजने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर वर्चस्व राखत इंग्लंडला जेरीस आणले. विंडीजने 20 षटकांत 6 बाद 196 धावा फटकावल्यानंतर इंग्लंडला सर्वबाद 166 धावांवर समाधान मानावे लागले.

रुदरफोर्डने खर्‍या अर्थाने ‘कॅरेबियन फ्लेव्हर’ दाखवत वानखेडेवर उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. त्याने अवघ्या 42 चेंडूंत 5 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 76 धावांची आतषबाजी केली. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांना गुडाकेश मोटीच्या फिरकीने चांगलेच जाळ्यात अडकवले. खेळपट्टीवर मिळणार्‍या ‘ग्रीप’चा अचूक फायदा घेत विंडीजच्या फिरकीपटूंनी इंग्लंडच्या धावगतीला लगाम घातला.

197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. ठरावीक अंतराने विकेटस् पडत गेल्याने इंग्लंडचा डाव 19 षटकांत अवघ्या 166 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून सॅम करणने सर्वाधिक नाबाद 43 धावा केल्या; परंतु तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.

धावफलक

विंडीज : 20 षटकांत 6 बाद 196. (शेरफेन रुदरफोर्ड 42 चेंडूंत 2 चौकार, 7 षटकारांसह नाबाद 76, रॉस्टन चेस 34, होल्डर 33. ओव्हर्टन, रशिद प्रत्येकी 2 बळी)

इंग्लंड : 19 षटकांत सर्वबाद 166. (सॅम करण 30 चेंडूंत नाबाद 43, जेकब बेथेल 33. गुडाकेश मोटी 3/33 , रॉस्टन चेस 2/29).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news