पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील T20I मालिकेतील पहिला सामना बुधवारी साउथम्प्टन येथे खेळला गेला. ट्रॅव्हिस हेडच्या झंझावती फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा २८ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर टी-20 मालिकेत १-0 अशी आघाडीही घेतली. ( australia vs england T-20 )
टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.जेमी ओव्हरटन, जेकब बेथन आणि जॉर्डन कॉक्स यांनी इंग्लंडसाठी टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा या सामन्यातून प्रारंभ केला.( australia vs england T-20 )
इंग्लंडने प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपल्या डावाची धडाकेबाज सुरुवात केली. हेड आणि शॉर्टने पॉवरप्लेमध्ये ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात केली. पॉवरप्लेमध्ये (पहिली सहा षटके) गडी गमावत ८६ धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडने 23 चेंडूत चार षटकार आणि आठ चौकारांसह केलेल्या ५९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने १७९ धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या गोलंदाजांवर प्रचंड दबाव आणल्यामुळे खेळावर निर्णायक प्रभाव पाडला. ( australia vs england T-20 )
इंग्लंडचा विल जॅक्स लवकर जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर तंबूत परतला. कर्णधार फिल सॉल्टने १२ चेंडू खेळत फक्त 20 धावांचे योगदान दिले. पहिला सामना खेळणार्या जॉर्डन कॉक्सने 12 चेंडूत 17 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या ॲबॉटने तीन विकेट्स घेतल्या. आता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात शुक्रवारी दुसऱ्या T20I सामना होणार आहे.
ऑस्ट्रेलिया संघाने स्कॉटलंडला 3-0 ने पराभूत केल्यानंतर त्यांची विजयी घोडदौड कायम राहिली आहे. T20I सामन्यात ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडमधील तिसरा विजय देखील ठरला आहे. लियाम लिव्हिंगस्टोनचे अष्टपैलू प्रयत्न व्यर्थ गेले. लिव्हिंगस्टोनने 37 धावा केल्या आणि तीन बळी घेतले.