FIFA World Cup 2026 | रोनाल्डो फिका पडला; काँगोने पोर्तुगालला १-१ बरोबरीत रोखले

FIFA World Cup 2026 |
FIFA World Cup 2026 | रोनाल्डो फिका पडला; काँगोने पोर्तुगालला १-१ बरोबरीत रोखले
Published on
Updated on

ह्यूस्‍टन; वृत्तसंस्‍था : एकीकडे, मेस्‍सीची जादू चांगलीच बहरली असताना रोनाल्‍डोकडून अपेक्षा असण्‍यातही काहीच गैर नव्‍हते. पण, फिफा विश्‍वचषकातील सलामीच्‍या लढतीत रोनाल्‍डोचा खेळ शेवटपर्यंत बहरलाच नाही आणि पोर्तुगालला येथे १-१ अशा फरकाने रोखून धरण्‍यात प्रजासत्ताक काँगोला आलेले यश फुटबॉल वर्तुळासाठी धक्‍कादायक ठरले.

सामन्याच्या ६ व्या मिनिटालाच पेद्रो नेतोच्या पासवर जोआओ नेवेसने शानदार हेडर करत पोर्तुगालला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर ही आघाडी भक्‍कम करण्‍याचे त्‍यांनी अनेक प्रयत्‍न केले. त्‍यात मात्र त्‍यांना यश आले नाही. उलटपक्षी, पहिल्या सत्राच्या अगदी शेवटच्या मिनिटाला (४५+५ मिनीट) आर्थर माशुआकूच्या क्रॉसवर योआने विस्साने हेडरद्वारे गोल करत काँगोला १-१ अशा बरोबरीवर आणले. हा काँगोच्या विश्वचषक इतिहासातील पहिलाच गोल देखील ठरला.

पोर्तुगालने पहिल्या सत्रात तब्बल ७८ टक्के बॉल पजेशन राखत सामन्यावर ताबा मिळवला होता, मात्र काँगोच्या मजबूत बचावामुळे त्यांना अधिक गोल करता आले नाहीत. अगदी दुसर्‍या सत्रातही त्‍यांनी केलेले हरेक प्रयत्‍न निष्‍फळ ठरले. जोआओ काँसेलोने बायसिकल किकवर गोलजाळ्याचा वेध घेतला असला तरी ऑफसाईडमुळे तो वैध ठरला नाही. या बरोबरीमुळे दोन्ही संघात गुण विभागले गेले. मात्र, पोर्तुगालसारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध मिळविलेला गुण काँगोसाठी विजयापेक्षा कमी नव्हता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news