Doping Scandal | थाळीफेकपटू बनवीरवर 7 वर्षांची, तर धावपटू हरेंद्रवर 4 वर्षांची बंदी

उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने कारवाई
Doping Scandal |
Doping Scandal | थाळीफेकपटू बनवीरवर 7 वर्षांची, तर धावपटू हरेंद्रवर 4 वर्षांची बंदी
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारताचा थाळीफेकपटू बनवीर सिंग याच्यावर राष्ट्रीय उत्तेजकविरोधी अपील पॅनेलने उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे 7 वर्षांची मोठी बंदी घातली आहे. शिस्तपालन समितीने आधी दिलेल्या शिक्षेत अपील पॅनेलने दोन वर्षांची वाढ केली आहे. दुसर्‍या एका प्रकरणात, लांब पल्ल्याचा धावपटू हरेंद्र कुमार याच्यावर 2 ऑगस्ट 2026 पासून लागू होईल अशी आणखी चार वर्षांची निलंबनाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यापूर्वी 3 ऑगस्ट 2022 रोजी ‘डार्बेपोएटिन’ या प्रतिबंधित पदार्थाचे सेवन केल्याबद्दल एडीडीपीने त्याच्यावर चार वर्षांची बंदी घातली होती.

नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीच्या शिस्तपालन समितीने गेल्या वर्षी ‘मेथांडिएनोन’ या प्रतिबंधित स्टिरॉईडच्या सेवनाबद्दल बनवीरला 23 डिसेंबर 2024 पासून पाच वर्षांसाठी निलंबित केले होते. याशिवाय, 12 महिन्यांच्या कालावधीत सलग तीन वेळा आपल्या ठावठिकाणाची अचूक माहिती न दिल्यामुळे तो यापूर्वीच 22 डिसेंबर 2026 पर्यंत दोन वर्षांची निलंबनाची शिक्षा भोगत आहे. ‘एडीएपी’ने ही बंदी वाढवून आता सात वर्षे केली असली, तरी या वाढीव शिक्षेचे नेमके कारण ‘नाडा’ने स्पष्ट केलेले नाही. 37 वर्षीय बनवीर सिंग हा उत्तेजक चाचणीत अडकलेला देशातील सर्वात वयस्कर खेळाडू ठरण्याची शक्यता आहे. 2022 इंडियन ग्रँड प्रिक्समधील दुसर्‍या स्थानाचा अपवाद वगळता बनवीरला कधीही पहिल्या तीन क्रमांकात स्थान मिळवता आलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news