Tata Steel Chess 2026 | डी. गुकेशचा पहिला विजय, अर्जुन एरिगेसी पराभूत

D Gukesh first victory
Tata Steel Chess 2026 | डी. गुकेशचा पहिला विजय, अर्जुन एरिगेसी पराभूत
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : नेदरलँडस्मधील विज्क आन झी येथे सुरू असलेल्या टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्या फेरीत भारताच्या विश्वविजेत्या डी. गुकेशने आपला पहिला विजय नोंदवला असला, तरी जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या अर्जुन एरिगेसीला पराभवाचा धक्का बसला आहे.

गेल्या चार फेर्‍यांपासून बरोबरीवर समाधान मानणार्‍या डी. गुकेशने पाचव्या फेरीत चेक प्रजासत्ताकच्या थाई दाई वान गुयेन याचा पराभव केला. काळ्या मोहर्‍यांनी खेळताना गुकेशने तांत्रिकदृृदष्ट्या उत्कृष्ट खेळ केला. त्याने आपल्या हत्तीचा त्याग करून प्रतिस्पर्ध्यावर दबाव आणला आणि 51 चालींमध्ये विजय मिळवला. या विजयामुळे तो 3 गुणांसह संयुक्तपणे चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

अर्जुनला धक्का

या स्पर्धेत आघाडीवर असलेल्या अर्जुन एरिगेसीला स्लोव्हेनियाच्या व्लादिमीर फेडोसेव्हने पराभूत केले. अर्जुनने पांढर्‍या मोहर्‍यांनी खेळताना काही जोखीम पत्करली, जी त्याच्या अंगलट आली. मध्यंतरापर्यंत अर्जुनची स्थिती कमकुवत झाली होती, ज्याचा फायदा फेडोसेव्हने घेत विजय मिळवला. या पराभवामुळे अर्जुन 2.5 गुणांसह सातव्या स्थानावर घसरला आहे. इतर लढतीत भारताच्या आर. प्रज्ञानंदने हॉलंडच्या अनिश गिरीविरुद्ध आपली तिसरी बरोबरी साधली. तो सध्या 1.5 गुणांवर आहे. अरविंद चिदंबरमला जर्मनीच्या विन्सेंट केमरकडून पराभव स्वीकारावा लागला. अरविंददेखील 1.5 गुणांवर आहे. या स्पर्धेत अजून 9 फेर्‍या शिल्लक आहेत, त्यामुळे भारतीय खेळाडूंना पुनरागमन करण्याची मोठी संधी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news