IPL 2020 : दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार मराठमोळा तुषार आहे तरी कोण?

दुबई : पुढारी ऑनलाईन

आयपीएलच्या तेराव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने १३ धावांनी राजस्थान रॉयल्सला हार मानण्यास भाग पाडले. डीसीच्या ७ बाद १६१ धावांचा पाठलाग करताना आरआरला ८ बाद १४८ धावांपर्यंतच मजल मारता आहे. मात्र, क्रिकेट जगतात चर्चा रंगली ती म्हणजे दिल्लीच्या या विजयात मोलाचा वाटा असाणाऱ्या मराठमोळ्या तुषार देशपांडेची. पर्दापणातच तुषारे सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे.

दिल्लीकडून खेळताना तुषारने पर्दापणातच चौथ्या षटकात राजस्थान रॉयल्सला ३७ धावा देत २ बळी टिपले. आरआरचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आणि श्रेयस गोपाळ यांना तुषारने  पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

पहिल्याच सामन्यात तुषारने डावातील अखेरचे षटकही चांगले टाकले. या सामन्यात राजस्थानला जिंकायला २२ धावांची गरज होती. यावेळी राहुल तेवातिया हा जबरदस्त फटकेबाजी करत होता. पण अखेरच्या षटकातील पहिल्या चार चेंडूंमध्ये तुषारने फक्त चारच धावा दिल्या. त्याचबरोबर या षटकात राहुलचा एक झेलही टिपण्याची नामी संधी तुषारकडे होते. तुषार हा झेल पकडायलाही गेला. पण तुषारच्या मार्गात यावेळी राजस्थानचा फलंदाज श्रेयस गोपाळ आला आणि झेल पकडण्याची संधी हुकली.

पण त्यानंतरही तुषार निराश झाला नाही. कारण या षटकाच्या अखेरच्या चेंडूंवर तुषारने श्रेयसला बाद करत आपला दुसरा बळी मिळवला आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

दिल्लीला विजय मिळवून देणारा तुषार आहे तरी कोण? 

आयपीएलच्या पहिल्या हंगामात म्हणजेच २००८ मध्ये तुषार देशपांडे मुंबईत बॉल बॉय होता. त्यावेळी तुषार अंडर-13 मध्ये खेळत होता. दिल्लीने या मॅचमध्ये हर्षल पटेलच्याऐवजी तुषार देशपांडेला संधी दिली होती. तुषारचा आयपीएलचा पहिलाच सामना होता. दिल्लीने २० लाख रुपयांच्या बेस प्राईजवर तुषारला लिलावात खरेदी केले होते. सहा महिन्यानंतर तुषारने पहिल्यांदाच बॉलिंग केली. आपल्या बॉलिंगने बॅट्समनना त्रास देणाऱ्या तुषारला स्वत:लाच सुरुवातीला बॅट्समन व्हायचे होते, पण बॅट्समनची मोठी रांग बघून त्याने बॉलर व्हायचे ठरवले.

कल्याणमध्ये राहणारा तुषार देशपांडे लोकल ट्रेनने शिवाजी पार्क जिमखान्यात आला. मुंबईतल्या ट्रेनच्या गर्दीमध्ये तुषार आधीच दमला होता. जिमखान्यात पोहोचल्यानंतर तुषारला तिकडे बॅट्समनची मोठी रांग दिसली, मग तो बॉलरच्या रांगेत जाऊन उभा राहिला. इकडूनच त्याचा बॉलर बनण्याचा प्रवास सुरू झाला.

देशपांडेची क्रिकेट कारकीर्द

२५ वर्षांचा तुषार देशपांडे मध्यमगती बॉलर आहे. मुंबईकडून त्याने अंडर-16 आणि अंडर-19 क्रिकेट खेळलं आहे. सोबतच तो इंडिया-ए आणि इंडिया ब्लू कडूनही खेळला आहे. कूच बिहार ट्रॉफीमधल्या चमकदार कामगिरीमुळे तुषार चर्चेत आला. त्याचवर्षी २०१६-१७ साली तुषारला रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. २०१८-१९ च्या विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये तुषार देशपांडेने २३ रन देऊन 5 विकेट घेतल्या. तुषारने २० प्रथम श्रेणी मॅचमध्ये ५० आणि २० टी-20 मॅचमध्ये ३१ विकेट घेतल्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news