पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष पुढील महिन्यात होणार्या चॅम्पियन ट्रॉफीकडे लागले आहे. एकीकडे टीम इंडिया जय्यत तयारी करत असताना भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह हा तंदुरुस्तीसाठी झगडत आहे. त्याचा संघात समावेश आहे; परंतू या स्पर्धेत त्याचे खेळणे पूर्णपणे त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असेल. दरम्यान, काही रिपोर्टनुसार बुमराह स्पर्धेपूर्वी १०० टक्के तंदुरुस्त होणे हा एक चमत्कार असल्याचे मानले जात असल्याने टीम इंडियाचे टेन्शन कायम आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान बुमराहला पाठीच्या दुखापतीचा त्रास होत होता. यामुळे इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेस तो मुकला. तसेच वन-डे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधूनही तो बाहेर राहिला आहे. तिसऱ्या वन-डेमध्ये तो खेळणार का, हेही निश्चित नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुमराह दुखापतीवरील उपचारासाठी न्यूझीलंडचे डॉक्टर रोवन शौटेन यांच्या संपर्कात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर तो उपचारांसाठी न्यूझीलंडलाही जाऊ शकतो. त्यामुळे स्पर्धेपूर्वी तो १०० टक्के तंदुरुस्त होण्याची शक्यतेवरही सांशकता कायम आहे. आता बुमराहाला पर्याय कोण? याचा विचारही भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) करावा लागणार आहे.
चॅम्पियन ट्रॉफीपूर्वी बुमराह तंदुरुस्त झाला नाही तर बीसीसीआय त्याच्या जागी हर्षित राणा किंवा मोहम्मद सिराज यांना संधी देण्यचा विचार करत आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम न्यूझीलंडमधील शौटेन यांच्या संपर्कात आहे," असे बीसीसीआयच्या एका सूत्राने आहे. बोर्डाने बुमराहला न्यूझीलंडला पाठवण्याची योजनाही आखली आहे, पण ती अद्याप झालेली नाही. निवडकर्त्यांना माहित आहे की जर बुमराह वेळेवर १०० टक्के तंदुरुस्त झाला तर तो एक चमत्कार असेल.जर बुमराह लवरच तंदुरुस्त झाला नाही तर इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेचा भाग असलेल्या हर्षितला निवडीसाठी उपलब्ध करून दिले जाऊ शकते. शौटेन यांनी यार्पूीही बुमराहवर उपचार केले होते. त्यावेळी दुखापतीमुळे तो २०२२ चा टी२० विश्वचषक खेळू शकला नाही. त्याचे अहवाल न्यूझीलंडमधील डॉक्टरांना दिले जातील, असेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे.