Wimbledon Final 2025 : विम्‍बडनचा 'किंग' कोण? अल्काराझ की सिन्नर? जाणून घ्‍या आजच्‍या फायनलविषयी सविस्‍तर

अल्‍क'राज' खालसा करण्‍यासाठी सिन्नरला द्यावी लागणार कडवी झूंज
Wimbledon Final 2025
विम्बल्डन २०२५ स्पर्धेतील पुरुष एकेरीचा अंतिम सामन्‍यासाठी जॅनिक सिन्नर ( Jannik Sinner) आणि कार्लोस अल्काराझ ( Carlos Alcaraz ) सज्‍ज झाले आहेत.
Published on
Updated on

Wimbledon Final 2025 : विम्बल्डन २०२५ स्पर्धेतील पुरुष एकेरीचा अंतिम सामन्‍यासाठी जॅनिक सिन्नर ( Jannik Sinner) आणि कार्लोस अल्काराझ ( Carlos Alcaraz ) सज्‍ज झाले आहेत. टेनिसच्‍या जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित खेळाडूंची ही लढत टेनिसप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरणार आहे. यावर्षी ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम सामन्‍यात हे दोघे पुन्‍हा एकदा आमने-सामने येणार आहेत. फ्रेंच ओपन २०२५ च्या अंतिम सामन्यात दोघांचा सामना झाला होता.

दाेन्‍ही खेळाडूंची दिमाखात अंतिम फेरीत धडक

स्पेनचा 22 वर्षीय युवा टेनिसपटू कार्लोस अल्काराझने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. उपांत्‍य सामन्‍यात अमेरिकन टेनिसपटू टेलर फ्रिट्झला पराभूत करत त्‍याने सलग तिसर्‍यांदा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दुसर्‍या उपांत्य लढतीत जॅनिक सिन्नरने जोकोव्हिचचे आव्हान संपुष्टात आणत एकच खळबळ उडवली. अवघ्या 1 तास 40 मिनिटांच्या लढतीत सिन्नरने 6-3, 6-3, 6-3 असा जोकोव्हिचचा सरळ सेटस्मध्ये फडशा पाडला.

Wimbledon Final 2025
US Open 2022 | टेनिस जगताला मिळाला सर्वात तरुण नंबर वन, स्पेनच्या १९ वर्षीय कार्लोस अल्काराझची ‘अमेरिकन ओपन’‍‍‍‍‍‍‍‍‍ जेतेपदावर मोहोर

भारतीय प्रमाण वेळेनुसार सामना किती वाजता? कोठे पाहता येणार

कार्लोस अल्कारेझ विरुद्ध यानिक सिनर, विम्बल्डन २०२५ पुरुष एकेरी अंतिम सामना कधी खेळवला जाईल? कार्लोस अल्कारेझ विरुद्ध यानिक सिनर यांच्यातील विम्बल्डन २०२५ पुरुष एकेरी अंतिम सामना आज (दि. १३ जुलै) भारतीय वेळेनुसार अंदाजे सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी खेळवला जाईल. हा अंतिम सामना लंडन येथील सेंटर कोर्टवर खेळवला जाईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल.भारतात मोबाईलवर थेट प्रक्षेपण कोठे पाहता येईल? या सामन्याचे मोबाईलवर थेट प्रक्षेपण डिस्ने+ हॉटस्टार (Disney+ Hotstar) या ॲपवर पाहता येईल.

Wimbledon Final 2025
MS Dhoni Wimbledon : नदाल मारत होता, माही पाहत राहिला! विम्बल्डनमध्येही धोनीचा डंका

अल्‍कराज हॅट्ट्रिकसाठी सज्‍ज

माद्रिद ओपन वगळल्यानंतर दुखापतीतून परतल्यापासून कार्लोस अल्काराज अजिंक्य राहिला आहे. त्याने इटालियन ओपन, फ्रेंच ओपन आणि क्वीन्स क्लब (एचएसबीसी चॅम्पियनशिप) मध्ये सलग २४ विजय मिळवले आहेत. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला अल्काराज विम्बल्डन जेतेपदांची हॅटट्रिक करण्यासाठी सज्‍ज आहे. आज त्‍याने अंतिम सामना जिंकला तर सलग तीन विम्बल्डन जेतेपद जिंकणारा इतिहासातील तो पाचवा खेळाडू असेल. तसेच त्‍याचे सहावे ग्रँड स्लॅम जेतेपद असेल.

अल्काराझचे पारडे जड

अंतिम सामन्‍याचा विचार करता कार्लोस अल्काराझने जॅनिक सिन्‍नरवर ८-४ अशी आघाडी आहे. गेल्या दोन वर्षांचा विचार केला तर अल्काराझचे पारडे जड आहे. त्याने सिन्‍नरवर पाच अंतिम सामन्‍यात बाजी मारली आहे. सिन्‍नरने अल्‍काराझविरोधात शेवटचा विजय २०२३ च्या बीजिंग ओपन सेमीफायनलमध्ये मिळवला होता.

Wimbledon Final 2025
Wimbledon 2023 : विम्बल्डनच्या बक्षीस रकमेत घसघशीत वाढ

फ्रेंच ओपनमध्‍ये अल्‍काराझची स्‍वप्‍नवत खेळी

गेल्याच महिन्‍यात फ्रेंच ओपन ग्रँडस्‍लॅम स्‍पर्धेत अल्काराझ आणि सिन्‍नर आमने-सामने होते. सिन्‍नरने फायनलमध्ये दोन सेटची आघाडी मिळवली; पण अल्काराझने जबरदस्‍त खेळाचे प्रदर्शन करत ४-६, ६-७, ६-४, ७-६, ७-६ असा विजय मिळवला. निर्णायक क्षण? चौथ्या सेटमध्ये ३-५, ०-४० अशा पराभवाचा सामना करताना अल्काराजने तीन मॅच पॉइंट वाचवले, हे या सामन्‍यातील ठळक वैशिष्‍ट ठरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news