ayush mhatre retired out: अर्धशतक ठोकूनही 'रिटायर्ड आऊट' झालेल्या आयुष म्हात्रेचं रेकॉर्ड झालं खराब

ayush mhatre retired out
ayush mhatre retired outpudhari
Published on
Updated on

ayush mhatre retired out: चेन्नईस सुपर किंग्जचा तरूण फलंदाज आयुष म्हात्रेने दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध अर्धशतकी खेळी केली. मात्र त्याला संघाने रिटायर्ड आऊट केल्यानं त्याच्या नावावर एक वाईट रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. आयुष म्हात्रे हा अर्धशतक ठोकूनही रिटायर्ड आऊट होणारा आयपीएलमध्ये सीएसकेकडून खेळणारा दुसरा असा खेळाडू ठरलाय.

२० वर्षाच्या आयुष म्हात्रेने ३६ चेंडूत ५९ धावांची दमदार खेळी केली. मात्र सीएसकेने रणनिती म्हणून १८ व्या षटकात आयुषला रिटायर्ड आऊट करून माघारी बोलावले. त्यावेळी सीएसकेच्या २ बाद १७५ धावा झाल्या होत्या. सीएसकेला शेवटच्या षटकात वेगाने धावा करायच्या होत्या.

ayush mhatre retired out
IPL 2026 KKR vs PBKS: दिला एक पॉईंट... पंजाबींचे ह्रदय खूप मोठे म्हणत श्रेयस अय्यरच्या बहिणीने केकेआरची चांगलीच खेचली

संजू सोबत दमदार भागीदारी

दरम्यान, रिटायर्ड आऊट होण्यापूर्वी आयुष म्हात्रे आणि संजू सॅमसन यांनी मिळून ११३ धावांची भागीदारी रचली होती. सीएसकेकडून दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध दुसऱ्या विकेटसाठी केलेली सर्वात मोठी भागीदारी होती. यापूर्वी २०२३ मध्ये डेवॉन कॉन्वे आणि ऋतुराज गायकवाड यांनी दिल्ली विरूद्ध १४१ धावांची भागीदारी रचली होती.

आयुष म्हात्रेने मधल्या षटकात सावधगिरी बाळगत फलंदाजी केली. त्यामुळं संघाची धावसंख्या सतत वाढत राहिली. पॉवर प्लेमध्ये सीएसकेने ६१ धावा केल्या होत्या. ऋतुराज गायकवाड १५ धावांवर बाद झाला. त्यानंतर देखील म्हात्रे आणि संजू सॅमसन यांनी संघाची धावगती कमी होऊ दिली नाही.

ayush mhatre retired out
Shreyas Iyer Punishment: अय्यर ठरला आयपीएलच्या हंगामातील नियमभंगाचा पहिला गुन्हेगार; सामना जिंकूनही खिसा झाला रिकामा

म्हात्रेला का रिटायर्ड आऊट केलं?

शेवटच्या षटकांमध्ये सीएसकेची धावगती थोडी संथ झाली होती. लुंगी एन्गिडी आणि टी नटराजन यांच्याविरूद्ध सीएसकेला धावा करण्यात अपयश येत होतं.

यानंतर संघाने एक मोठा निर्णय घेत शिवम दुबेला आता पाठवलं. हा निर्णय वेगाने धावा करण्यासाठी घेण्यात आला. दुबेने आल्या आल्या आक्रमक फलंदाजी केली आणि सीएसकेला २०० धावांच्या पार पोहचवले. सीएसकेने २० षटकात २ बाद २१२ धावा ठोकल्या. यात म्हात्रे आणि सॅमसन यांच्या भागीदारीचा मोठा वाटा होता.

ayush mhatre retired out
IPL 2026 KKR : 6,6,6,6,6... केकेआरमध्ये 'रघु'राज! आयपीएलपूर्वीच शतक ठोकत माहोल केला सेट; मॅनेजमेंटला संदेश थेट

अप्रिय विक्रमाची नोंद

जरी आयुष म्हात्रेने अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला असला तरी म्हात्रेच्या नावावर एक अप्रिय रेकॉर्ड नोंदवला गेला. आता आयुष म्हात्रे हा आयपीएलमध्ये संघाकडून रिटायर्ड आऊट होणाऱ्या काही कमी खेळाडूंमध्ये सामील झाला आहे. यात रविचंद्रन अश्विन, अथर्व तायडे, साई सुदर्शन, तिलक वर्मा आणि डेवॉन कॉन्वे यांचा समावेश होता आता त्यात आयुषचं नाव देखील नोंदवलं गेलं आहे.

डेवॉन कॉन्वे हा सीएसकेचा पहिला खेळाडू होता ज्याला रिटायर्ड आऊट करण्यात आलं होतं. आता आयुष म्हात्रे हा सीएसकेचा दुसरा खेळाडू झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news