पंत अक्सर पटेलला ‘वसिम भाई’ का म्हणतो?

अहमदाबाद : पुढारी ऑनलाईन 

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयात महत्वाची कामगिरी करणारा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल सध्या नव्या नावाने चर्चेत आला आहे.  अक्षर पटेलला क्रिकेट जगतात विशेष म्हणजे यष्टीरक्षक ऋषभ पंत  त्याला वसिम भाई अशी हाक मारतो. त्यामुळे अनेकांच्या मनात या नावामागचे रहस्य काय आहे? असा सवाल उपस्थित झाला होता. दरम्यान, खुद्द अखर पटेलने या नावा मागचा खुलासा केला आहे. 

विजयानंतर अक्षर पटेलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी त्याला यावेळी त्याला माजी क्रिकेटपटू मुरली कार्तिकने स्टंपमागून ऋषभ पंत तुला वसिम भाई का बोलवतो हा प्रश्न विचारला. 

यावर अक्षर पटेल म्हणाला…

ते सगळे मला वसिम भाई म्हणतात कारण माझा आर्म बॉल वसिम भाई (वसिम अक्रम) टाकायचे. त्याप्रमाणेच फलंदाजांसाठी घातक आहे असं त्यांना वाटतं. जेव्हा मी आर्म बॉल टाकतो तेव्हा, तू वसिम भाईप्रमाणेच आर्मबॉल टाकतोस असं पंत म्हणतो. अज्जू भाईने (अजिंक्य रहाणे) एकदा मला या नावाने हाक मारली आणि तेव्हापासून ऋषभ पंत  त्याच नावाने हाक मारतो, असा खुलासा अक्षर पटेलने केला.

भारताच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलच्या गोलंदाजीने. त्याने पहिल्या डावात सहा आणि दुसऱ्या डावात पाच बळी घेत इंग्लंडच्या फलंजादांची अक्षरशः भंबेरी उडवली. अक्षरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. विजयाचा हिरो ठरलेल्या अक्षरने पुरस्कार स्वीकारताना, फलंदाजीत नाही तर किमान गोलंदाजीत तरी योगदान दिल्याचा आनंद आहे असे म्हटले आहे. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news