

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिसने त्याच्या एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा तात्काळ निर्णय घेतला. त्याने टी-२० क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार असल्याने हा निर्णय घेण्याचे सांगितले आहे. स्टॉइनिसने २०१५ मध्ये पदार्पण केल्यापासून ७१ सामन्यांमध्ये खेळला आहे. स्टॉइनिसला यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात स्थान देण्यात आले होते. मात्र आता त्याच्या जागा दुसऱ्या खेळाडूला संधी मिळणार असल्याची माहिती 'क्रिकबज'ने दिले आहे.
"ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीय क्रिकेट खेळणे हा एक अविश्वसनीय प्रवास होता आणि मी सुवर्ण काळात घालवलेल्या प्रत्येक क्षणाबद्दल कृतज्ञ आहे. सर्वोच्च स्तरावर माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे ही अशी गोष्ट आहे जी मी नेहमीच जपून ठेवेन," स्टॉइनिस म्हणाला. "हा सोपा निर्णय नव्हता, परंतु मला वाटते की एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याची आणि माझ्या कारकिर्दीच्या पुढील टप्प्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याची ही योग्य वेळ आहे. माझे अँड्र्यू मॅकडोनाल्ड सोबत एक उत्तम नाते आहे आणि मी त्याच्या पाठिंब्याचे खूप कौतुक करतो," तो पुढे म्हणाला.
स्टॉइनिसने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली ती त्याच्या दुसऱ्याच सामन्यात २०१७ मध्ये ऑकलंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याने नाबाद १४६ धावा चोपल्या. गेल्या नोव्हेंबरमध्ये पाकिस्तान दौऱ्यावर शेवटचा खेळला होता आणि त्याने या फॉरमॅटमध्ये ७१ सामन्यात १४९५ धावा आणि ४८ विकेट्स घेतल्या आहेत. स्टॉइनिस २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता आणि २०१८-१९ मध्ये तो संघाचा वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू होता.