

AUS vs IND 2nd :
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला दोन विकेट्सने हरवून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकांमुळे भारताने ५० षटकांत नऊ बाद २६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू शॉर्ट आणि कूपर कॉनोली यांनी अर्धशतके झळकावली, ज्यामुळे संघाला ४६.२ षटकांत आठ बाद २६५ धावांपर्यंत पोहोचता आले. लक्ष्याचा पाठलाग करताना, ऑस्ट्रेलियाने ५४ धावांवर दोन विकेट्स गमावल्या, परंतु मॅथ्यू शॉर्टने डाव स्थिरावला आणि अर्धशतक झळकावले. त्याला मॅट रेनशॉने साथ दिली. भारताने रेनशॉ आणि अॅलेक्स कॅरीचे बळी घेतले, ज्यामुळे ऑस्ट्रेलियावर दबाव वाढला. त्यानंतर हर्षित राणाने शॉर्टलाही बाद केले. तथापि, कोनोलीने आपली पकड कायम ठेवली आणि ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला. भारताला शेवटी काही विकेट्स मिळाल्या, पण ऑस्ट्रेलिया लक्ष्याच्या इतक्या जवळ पोहोचला होता की भारताचा पराभव निश्चित झाला.
ऑस्ट्रेलियाकडून शॉर्टने सर्वाधिक ७४ धावा केल्या, तर कॉनॉली ६१ धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल ओवेनने ३६, मॅट रेनशॉ ३०, ट्रॅव्हिस हेड २८, मिचेल मार्श ११, केरी ९, मिचेल स्टार्क ४ आणि झेवियर बार्टलेटने ३ धावांचे योगदान दिले. भारताकडून अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारताचं २६५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला भारतानं सुरूवातीलाच दोन धक्के दिले होते. अर्शदीपनं मार्शला तर हर्षित राणानं ट्रव्हिस हेडला बाद करत तगडा झटका दिला होता. मात्र त्यानंतर मॅथ्यू शॉर्ट आणि रेनशॉ यांनी भागीदारी रचत संघाला वीसाव्या षटकातच शतकी मजल मारून दिली.
AUS 187-5 (36)
36 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर हर्षित राणाच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रत्यतन मॅथ्यू शॉर्टने सिराजकडे झेल दिला. शॉटने ७८ चेंडू ४ चौकार आणि २ षटकार पटकावत ७४ धावा केल्या. १८७ धावांवर ऑस्ट्रेलियास पाचवा धक्का बसला आहे.
वॉशिंग्टन सुंदरने २८ षट्कात केरीला बोल्ड केलरे. त्याने १७ चेंडूत ९ धावा केल्या .
कांगारूला २२ व्या षटकामध्ये तिसरा धक्का बसला, रेनशॉला अक्षर पटेल याने तंबूत धाडले. त्याने ३० चेंडूत ३० धावा केल्या. २४ षटकांचा खेळ संपल्यानंतर कांगारूने ११७ धावांवर तीन गडी गमावले आहेत.
भारतानं कांगारूंन ५४ धावांवर असताना दोन धक्के दिले होते. मात्र त्यानंतर मॅथ्यू शॉर्ट आणि रेनशॉ यांनी कांगारूंचा डाव सवरत संघाला २० षटकांच्या आतच शंभरी पार करून दिली
भारताचं २६४ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला अर्शदीप सिंगनं पहिला धक्का दिला. त्यानं मिचेल मार्शला ११ धावांवर बाद केलं.
अॅडम झाम्पा आणि ब्रेटलेट यांनी दमदार गोलंदाजी करत भारताला ५० षटकात २६४ धावांपर्यंत रोखले. झाम्पाने ४ तर ब्रेटलेटनं ३ विकेट्स घेतल्या. स्टार्कने २ विकेट्स घेत त्यांना चांगली साथ दिली.
रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११८ धावांची दमदार भागीदारी रचली. मात्र ७३ धावांवर खेळणाऱ्या रोहितला स्टार्कनं बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर अर्धशतक पूर्ण करणाऱ्या अय्यरला झाम्पानं ६१ धावांवर बाद करत भारताला चौथा आणि मोठा धक्का दिला.
भारताचा सलामीवीर रोहित शर्मानं सलग दोन धक्क्यानंतर डाव सावरला. त्यानं अर्धशतक ठोकत भारताला शतकाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं. त्याला श्रेयस अय्यर चांगली साथ देत आहे.
ऑस्ट्रेलियानं भारताला दोन मोठे धक्के दिले. बार्टलेटने सलामीवीर गिलला ९ धावांवर बाद केल्यानंतर विराट कोहलीची देखील शुन्यावर शिकार केली.
दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळं रोहितला वगळण्यात येईल या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.