UEFA Europa League | युरोपा लीग : अ‍ॅस्टॉन व्हिला विजेते; 44 वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात

UEFA Europa League |
UEFA Europa League | युरोपा लीग : अ‍ॅस्टॉन व्हिला विजेते; 44 वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात
Published on
Updated on

इस्तंबूल-तुर्की; वृत्तसंस्था : अ‍ॅस्टॉन व्हिला फुटबॉल क्लबने युफा युरोपियन लीग स्पर्धेत तब्बल 44 वर्षांनंतर विजेतेपद मिळवत जेतेपदाचा तब्बल 44 वर्षांचा दुष्काळ यावेळी संपुष्टात आणला. बेसिक्टास पार्क येथे रंगलेल्या निर्णायक अंतिम फेरीत या संघाने एससी फ्रायबर्गचा 3-0 असा धुव्वा उडवत विजयावर शिक्कामोर्तब केले. 1982 मधील युरोपियन कपनंतरचे या क्लबचे हे पहिलेच प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय विजेतेपद आहे.

या विजयामुळे अ‍ॅस्टॉन व्हिलाचे व्यवस्थापक उनाई एमरी यांनी पाचव्यांदा युरोपा लीगचे विजेतेपद पटकावून या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम रणनीतीकार म्हणून स्वतःचे स्थान पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. 1982 च्या ऐतिहासिक विजेतेपदाची आठवण म्हणून अ‍ॅस्टॉन व्हिलाचा संघ या सामन्यात पांढर्‍या रंगाच्या जर्सीत मैदानात उतरला होता.

पहिल्या सत्राच्या उत्तरार्धात अवघ्या 7 मिनिटांच्या अंतरात दोन गोल करत अ‍ॅस्टॉन व्हिलाने सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले. मॉर्गन रॉजर्सच्या अचूक पासवर युरी टायलेमन्सने अप्रतिम व्हॉली मारत पहिला गोल केला. या धक्क्यातून फ्रायबर्ग सावरण्यापूर्वीच, भरपाई वेळेत एमिलियानोने पेनल्टी बॉक्सच्या बाहेरून एक उत्कृष्ट वळणदार फटका मारत चेंडू गोलपोस्टमध्ये धाडला आणि व्हिलाची आघाडी 2-0 अशी मजबूत केली. सामन्याच्या 55 व्या मिनिटाला मॉर्गन रॉजर्सने तिसरा गोल करत फ्रायबर्गच्या पुनरागमनाच्या आशा संपुष्टात आणल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news