राष्ट्रीय स्पर्धा २०२२ : आदिती-ओजस भेदणार सुवर्णपदकाचे लक्ष; महाराष्ट्राचे तिरंदाज सुवर्णपदकाच्या लढतीसाठी पात्र

राष्ट्रीय स्पर्धा २०२२
राष्ट्रीय स्पर्धा २०२२

अहमदाबाद, पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र संघातील आंतरराष्ट्रीय तिरंदाज आदिती स्वामी आणि ओजस देवतळे आता ३६ व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाचे लक्ष भेदण्यासाठी सज्ज झाले आहेत. हे दोघे कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदकाच्या लढतीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांना आता पदक आपल्या नावावर करण्याची मोठी संधी आहे.

नागपूर येथील तिरंदाज ओजस देवताळे यांनी आपल्या गटामध्ये उत्तराखंडच्या उमेश विरुद्ध सर्वोत्तम कामगिरी केली. या सर्वोत्तम कामगिरीमुळे तो गोल्ड मेडलच्या लढतीसाठी पात्र ठरला आहे. त्या पाठोपाठ आशिया चषकातील पदक विजेत्या आदिती स्वामिनी गोल मीटरसाठीच्या लढतीचा प्रवेश निश्चित केला. तिने उपांत्य फेरी दरम्यान पंजाबच्या परमिट कौर विरुद्ध उल्लेखनीय कामगिरी केली. अचूक लक्ष भेदून तिने १४८ -१४४ गुणांनी बाजी मारली. आता हीच लय कायम ठेवत हे दोघेही सुवर्णपदक जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत.

सातारा येथील तिरंदाज आदिती समोर आता दिल्लीची प्रगती असणार आहे. तसेच ओजसला पुरुष गटामध्ये हरियाणाच्या ऋषभचे आव्हान पेलावे लागेल. या दोघांच्या सर्वोत्तम कामगिरीमुळे महाराष्ट्र संघाच्या तिरंदाजी मधील पदकाच्या आशा उंचावल्या आहेत. या दोघांनी मुख्य प्रशिक्षक शुभांगी रोकडे प्रवीण सावंत मोंजीशन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news