पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा मुलगा अकाय याने गुगलच्या सर्च 2024 च्या यादीत स्थान मिळवले आहे. गुगल रिपोर्टनुसार, अकाय नावाचा अर्थ या वर्षी सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या शब्दांमध्ये आहे.
फेब्रुवारी २०२४ मध्ये अनुष्का आणि विराटला मुलगा झाला. त्यांनी मुलाचे नाव अकाय ठेवल्याचे जाहीर केले. यानंतर हे नाव इतके लोकप्रिय झाले की लोकांनी गुगलवर जाऊन त्याच्या नावाचा अर्थ शोधला.अकाय या शब्दाने Google च्या अर्थ प्रश्नांच्या यादीमध्ये स्थान मिळवले. अनेकांनी त्याच्या नावाचा अर्थ सर्च इंजिनवर शोधला.अनुष्का आणि विराटचे दुसरे अपत्य अकाय यांचा जन्म १५ फेब्रुवारी २०२४ रोजी झाला. आपल्या जन्माची घोषणा करताना या जोडप्याने म्हटले होते की, 'खूप आनंदाने आणि प्रेमाने भरलेल्या अंत:करणाने, आम्हाला सर्वांना सांगताना आनंद होत आहे की, 15 फेब्रुवारी रोजी आम्ही आमच्या बाळाचे अके आणि वामिकाच्या लहान भावाचे या जगात स्वागत केले. आमच्या आयुष्यातील या सुंदर काळात आम्ही तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मागतो. यावेळी आम्ही तुम्हाला आमच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करतो.
गुगल सर्च इंजिनच्या मते अकायचे दोन अर्थ आहेत. हिंदी शब्दकोश व संस्कृत भाषेनुसार 'अकाय' नावाचा अर्थ 'निराकार' असा होतो. ज्याला कोणतंही स्वरुप, देह व आकार नाही असा निराकार. तर तुर्कीमध्ये या नावाचा अर्थ चमकणारा चंद्र असा आहे.