French Open 2026 | अलेक्झांडरचा ऐतिहासिक विजय; ‘रोलँड गॅरोस'वर कोरले नाव

कोबोलीची झुंज अपयशी
French Open 2026 |
French Open 2026 | अलेक्झांडरचा ऐतिहासिक विजय; ‘रोलँड गॅरोस'वर कोरले नाव
Published on
Updated on

पॅरिस; वृत्तसंस्‍था : दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर जर्मन टेनिस स्टार अलेक्झांडर झ्वेरेव्हने ग्रँड स्लॅम जेतेपदाचा दुष्काळ संपवला आहे. रविवारी झालेल्या फ्रेंच ओपन पुरुष एकेरीच्या अत्यंत थरारक आणि अटीतटीच्या अंतिम सामन्यात झ्वेरेव्हने इटलीच्या फ्लॅव्हिओ कोबोलीचा ६-१, ४-६, ६-४, ६-७ (५-७), ६-१ असा पाच सेटच्या महासंग्रामात पराभव केला. कारकिर्दीतील चौथ्या प्रयत्नात झ्वेरेव्हने आपले पहिलेवहिले ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावत इतिहास रचला.

८९ वर्षांनंतर जर्मन खेळाडूचा डंकाया ऐतिहासिक विजयासह झ्वेरेव्हने टेनिस जगतात नवा विक्रम नोंदवला आहे. १९३७ मध्ये हेनर हेनकेल यांनी फ्रेंच ओपन जिंकली होती, त्यानंतर क्ले कोर्टवर जेतेपद मिळवणारा झ्वेरेव्ह हा पहिलाच जर्मन पुरुष खेळाडू ठरला आहे. तसेच २०२४ मधील ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये यानिक सिन्नेरने मिळवलेल्या यशानंतर, पहिले ग्रँड स्लॅम जिंकणारा झ्वेरेव्ह हा जगातील पहिलाच नवा खेळाडू ठरला आहे.

सामन्याच्या अंतिम क्षणांमध्ये कोबोली पूर्णपणे बॅकफूटवर गेला होता. झ्वेरेव्हला विजयासाठी तीन चॅम्पियनशिप पॉईंट्स मिळाले. कोबोलीने पहिला पॉईंट वाचवत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला, मात्र एका निर्णायक क्षणी स्मॅश मारण्यात त्याला अपयश आले आणि सामना त्याच्या हातातून निसटला. पुढच्याच क्षणी झ्वेरेव्हने विजयी गुण मिळवत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. विजय मिळवताच झ्वेरेव्ह अत्यंत भावुक झाला आणि कोर्टवरच कोसळला. डोळ्यात आनंदाश्रूसह त्याने या ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news