Ishank Singh | धोनीच्या शाळेचा नवा 'चॅम्पियन' तारा! श्रीलंका ते भारत २९ किमीचा प्रवास ९ तासांत केला फत्ते

सात वर्षांच्या इशांकने पोहून ओलांडला समुद्र!
Ishank Singh |
Ishank Singh | धोनीच्या शाळेचा नवा 'चॅम्पियन' तारा! श्रीलंका ते भारत २९ किमीचा प्रवास ९ तासांत केला फत्ते
Published on
Updated on

धनुष्कोडी; वृत्तसंस्था : वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी जिद्द आणि अफाट मेहनतीच्या जोरावर झारखंडच्या इशांक सिंगने भारत आणि श्रीलंका दरम्यानची 29 कि.मी. लांबीची पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. रांचीच्या या ‌‘जलपुत्रा‌’ने हे अंतर 9 तास 50 मिनिटांत पूर्ण करून क्रीडाजगताचे लक्ष वेधून घेतले असून, अशी कामगिरी करणारा तो जगातील सर्वात युवा जलतरणपटू ठरला.

7-8 तासांचा सराव अन्‌‍ दुर्दम्य जिद्द

एप्रिल रोजी श्रीलंकेतील तलाईमन्नार येथून पहाटे प्रवासाला सुरुवात करत इशांकने तामिळनाडूतील धनुष्कोडी गाठले. इशांकच्या या यशाचे श्रेय त्याच्या कठोर परिश्रमाला जाते. त्याची आई मनीषा सिन्हा यांनी सांगितले की, गेल्या सहा महिन्यांपासून इशांक रांचीच्या धुर्व्हा डॅममध्ये दररोज 7 ते 8 तास सराव करत होता. त्याच्या या समर्पणामुळेच हे अशक्य वाटणारे स्वप्न सत्यात उतरले आहे.

पुढचे लक्ष्य : ‌‘टू-वे‌’ स्विमिंग

रांचीत परतल्यावर इशांकचे जंगी स्वागत करण्यात आले. मला अजून प्रगती करायची आहे. आता पाल्कची सामुद्रधुनी दोन्ही बाजूंनी (जाणे आणि येणे) पोहून पूर्ण करण्याचे माझे स्वप्न आहे, असा निर्धार या चिमुरड्या चॅम्पियनने व्यक्त केला. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही इशांकचे अभिनंदन करत, त्याचे यश शिस्त आणि समर्पणाचे उत्तम उदाहरण असल्याचे म्हटले आहे.

धोनीच्या शाळेचा नवा तारा

ज्या शाळेतून महेंद्रसिंग धोनीने शिक्षण घेतले, त्याच जवाहर विद्या मंदिर (श्यामली) शाळेत इशांक तिसरीत शिकत आहे. या पराक्रमामुळे ‌‘युनिव्हर्सल रेकॉर्डस्‌‍ फोरम‌’ने त्याला ‌‘यंगेस्ट अँड फास्टेस्ट पाल्क स्ट्रेट स्विमर‌’ किताब देऊन गौरवले आहे. प्रशिक्षक अमन जयस्वाल आणि बजरंग कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने तामिळनाडूच्या जय जसवंतचा जुना विक्रम मोडीत काढला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news