

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा संघ निवडण्यासाठी निवड समितीची नवी दिल्लीत गुरुवारी (दि.३०) बैठक झाली. भारतीय संघ द. आफ्रिकेदरम्यान ३ टी-20, ३ एकदिवसीय आणि २ कसोटी सामने रंगणार आहेत. दरम्यान, आज (दि.३०) तिन्ही फॉरमॅटसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. टी-20 साठी कर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमार यादववर सोपवण्यात आली आहे, तर केएल राहुल एकदिवसीय मालिकेसाठी कर्णधार असणार आहे. कसोटी संघाची कमान रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. मोहम्मद शमीवर उपचार सुरु असल्याने सध्या तरी त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही.
(India Squad for South Africa tour)
कसोटीसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा (India Squad for South Africa tour)
टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघ : यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर , रवी बिश्नोई , कुलदीप यादव , अर्शदीप सिंग , मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर (India Squad for South Africa tour)
वनडेसाठी भारताचा संघ : ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, टिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार, यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर. (India Squad for South Africa tour)