

आशिया चषक स्पर्धेतील सुपर-4 मधील शेवटचा सामना भारतीय संघाने बांगला देशविरुद्ध खेळला. भारताने आधीच फायनलमध्ये प्रवेश निश्चित केल्यामुळे बांगला देशविरुद्धची मॅच ही केवळ औपचारिकता राहिली होती. त्यामुळे भारताने शुक्रवारच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये 5 बदल केले होते. विराट, हार्दिक पंड्या, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह व कुलदीप यादव यांना वगळण्यात आले.
विश्रांतीवर असलेला विराट कोहली सहकार्यांसाठी 'वॉटरबॉय' बनला होता; पण येथेही विराटचा मस्करीचा स्वभाव सुटला नाही आणि तो कांगारूसारख्या उड्या मारत मैदानावर पाणी घेऊन आल्याने सहकार्यांनाही हसू आवरले नाही. त्याचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी यावर लाईक्स आणि कॉमेंटस्चा पाऊस पाडला आहे.