KKR vs CSK : चेन्नईचा केकेआरवर मोठा विजय, ४९ धावांनी उडवला धुव्वा | पुढारी

KKR vs CSK : चेन्नईचा केकेआरवर मोठा विजय, ४९ धावांनी उडवला धुव्वा

पुढारी ऑनलाईन डेस्क : अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबेची दमदार अर्धशतकी खेळी आणि महिष तिक्ष्णाच्या फिरकीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्ज केकेआरवर ४९ धावांनी विजय मिळवला. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळवण्यात आला होता. कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकला आणि चेन्नईला फलंदाजीचे निमंत्रण दिले. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या चेन्नईने केकेआरसमोर २३६ धावांचे आव्हान ठेवले.

चेन्नईच्या २३६ आव्हानाचा पाठलाग करताना केकआरला १८६ धावाच करता आल्या. केकेआरकडून जेसन रॉयने २६ चेंडूमध्ये ६१ धावांची आक्रमक खेळी केली. तर रिंकू सिंगने नाबाद ५३ धावा केल्या. चेन्नईकडून तुषार देशपाडे आणि महिष तिक्ष्णाने प्रत्येकी २ बळी घेतले. तर आकाश सिंग, रवींद्र जडेजा, मोईन अली आणि महिष पथीराणाने प्रत्येकी १ विकेट पटकावली.

तत्पूर्वी चेन्नईकडून अजिंक्य रहाणे नाबाद २९ चेंडूमध्ये ७२ डेवॉन कॉनवेने ४० चेंडूमध्ये ५६ धावा, शिवम दुबे २१ चेंडूमध्ये ५० धावा, ऋतुराज २० चेंडूमध्ये ३५ धावा आणि रवींद्र जडेजाने ८ चेंडूमध्ये १८ धावांचे योगदान दिेले. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या फलंदाजांनी यथेच्छ धुलाई केली. केकेआरकडून कुलवंत खेजरोलियाने २ तर वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्माने प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या.

हेही वाचलंत का?

Back to top button